विकास म्हणजे काय | what is development | development in sociology
विकासाचा अर्थ -प्रगती करणे, पुढे जाणे, वाढ, उन्नत होणे. इंग्रजीत- प्रोग्रेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट असे शब्द वापरले जातात. सामान्यत: ग्रोथ किंवा वाढ ही नैसर्गिक किंवा आपोआप होणारी गोष्ट आहे. उदा. माणसाच्या वयातील वाढ, झाडाची वाढ, इत्यादी. त्यासाठी प्रयत्न करण्याची खास आवश्यकता नसते. याउलट ‘विकास’ (development) ही नियोजित वाढ असते. एका विशिष्ट, विहित उद्दिष्टाकडे ठरवून केलेली वाटचाल असते.
विकास म्हणजे काय | what is development | Definition of development
विकास म्हणजे उपभोग, अधिक उपभोग म्हणजे अधिक विकास, अधिक उत्पन्न म्हणजे अधिक विकास. उपभोग, उत्पादन आणि उत्पन्न यांची रेखीय वाढ ही विकासाचे द्योतक मानली जाते. विकासाचे आजचे प्रतिमान हे आहे.
•The purpose of development is a rise in the level and quality of life of the population, and the creation or expansion of local regional income and employment opportunities, without damaging the resources of the environment.
समतोल प्रगती म्हणजे विकास
सम्यक विकास विकासाचा विचार करताना प्रथम ध्येय निश्चिती व ते साध्य करण्यासाठी सम्यक (सुयोग्य) मार्गाची निवड महत्त्वाची ठरते. यावरून ध्येयमार्गावरील समतोल प्रगती म्हणजे विकास असे ढोबळमानाने म्हणता येईल.
According to the Amartya Sen –Development | विकासाच्या संदर्भात सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली.
विकासाच्या संदर्भात सेन यांनी क्षमतेची संकल्पना विकसित केली. ‘इक्वॉलिटी ऑफ व्हॉट?’ या त्यांच्या लेखात त्यांनी ती मांडली आहे. लोकांच्या क्षमता वाढायच्या असतील, तर त्यांचे हक्क अबाधित राहिले पाहिजे आणि ते बजाविण्याचे स्वातंत्र्य व योग्य त्या सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे.
उदा., लोकांना मतदानाचा निव्वळ हक्क देऊन उपयोग नाही, त्यांना तो बजावण्याचे योग्य व चांगले शिक्षण मिळाले पाहिजे.
विकासाचे निर्देशांक | Development indicators
- लोकांच्या जीवन जगण्याच्या परिस्थितीत किंवा स्तरात बदल सुधारणा होणे.
- दारिद्र्याचे नायनाट होणे.
- रोजगाराच्या संधी वाढणे लोकांना समान स्वरूपात संधी उपलब्ध होणे.
- दुर्बल घटकाची आर्थिक उन्नती होणे.
- जीवनात घडणाऱ्या घटनां पासून लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान होणे.
- सर्व प्रकारची विषमता भेदभाव नष्ट होणे.
- शिक्षणाचा प्रसार होणे.
- लोकांच्या व समुदायाच्या आरोग्याचे संवर्धन व संरक्षण होणे.
- पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होणे.
- लोकशाही कारभारात लोकांचा सहभाग वाढणे.
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा:-