मंडळे | mandal mahnje kay | What is Associations | association in sociology
मागील पोस्टमध्ये आपण प्राथमिक आणि दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये पाहिले. व्यक्ती त्यांच्या गरजा या समूहामध्ये पूर्ण करतो . तो त्यांच्या गरजा एकटा पूर्ण करू शकत नाही. काही गरजा त्यांच्या प्राथमिक समूहामध्ये भागविल्या जातात, तर काही गरजा या दुय्यम समूहात भागविल्या जातात. या पोस्टमध्ये समूहा सारखाच असलेला मानवी समूह म्हणजेच मंडळ ही संकल्पना पाहणार आहोत. थोडक्यात मंडळ म्हणजे काय?, त्यांच्या विविध व्याख्या, उदाहरणे आणि वैशिष्ठ्ये पाहणार आहोत.
मंडळ म्हणजे काय | What is Associations
मॅक आयव्हर आणि पेज “विशिष्ट हितसंबंध किंवा हितसंबंधांच्या सामान्य संचास साध्य करण्यासाठी तयार झालेल्या संघटित समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
ई, एस. बोगार्डस्- “काही समान उद्दिष्टे साध्य करण्याकरिता एकत्र आलेल्या लोकांच्या समूहास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
गिन्सबर्ग– “आपल्या काही खास गरजा किंवा ध्येय पूर्ण करण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या संघटनास ‘मंडळ’ असे म्हणतात.”
मंडळ व्याख्या | Definition of Association
Eubank “An organization deliberately formed for the collective pursuit of some interest which the members of it share is termed as an association”
ऑगबन आणि निमकॉफ– “विशिष्ट हितसंबंधांना केंद्रस्थानी मानून विकसित झालेल्या संघटनांना ‘मंडळ’ असे म्हणतात.”
Maciver and Page – “An association is group organized for the pursuit of an interest or group of interests in common.”
मंडळाची उदाहरणे / Examples of associations in Sociology
महिला मंडळ, वारकरी मंडळ, गणेश मंडळ, भजनी मंडळ, नाट्य मंडळ, क्रीडा मंडळ, कॉलेज, व्यापारी संघ, शाळा, क्रीडा संकुल,
राजकीय पक्ष, व्यावसायिक सोसायटी, धार्मिक संघटना इत्यादी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ ( ICC ), रोटरी कल्ब.
College or trade unions, schools, social and sports clubs, political parties, professional societies, business firms, religious organizations and NGO, BCCI, ICC Rotary club.
मंडळाची वैशिष्ट्ये | Characteristics of association
1.मंडळाला समान उद्दिष्ट किंवा गरजा असते (Common aims & objective )
2.मंडळाचे सदस्यत्व हे ऐच्छिक असते. (Voluntary membership)
3.मंडळास विशिष्ट नाव, प्रतीके व संविधान असते. (Constitutions)
4.मंडळाचे नियानात्मक स्वरूप काही ठिकाणी दिसून येते. ( Formal nature)
5.मंडळाची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते. (Consciously and deliberately formed)
6. मंडळ हे अस्थिर असते. (Temporary characters)
7. मंडळातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना असते. (Cooperation)
8. मंडळाची संरचना थोडीशी बंदिस्त आणि सैल अशी स्वरुपाची असते. (Closely or loosely structured)
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा:-प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics