समूहाचे प्रकार | Types of groups in sociology
मागील पोस्टमध्ये आपण समूह म्हणजे काय, अर्थ आणि त्यांच्या विविध व्याख्या पहिल्या. या पोस्टमध्ये आपण समूहाचे प्रकार पाहणार आहोत. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसाची जडण-घडण हे वेगवेगळ्या समूहांमध्ये होते. सामाजिक समूह हे मानवी समाजाचे सर्वात मूलभूत एकक आहे.( social groups is the most fundamental unit of human society). Do’s and Don’ts म्हणजेच एक दुसऱ्याशी वागणूक करताना ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या बदल समूह आपल्याला शिकवते. जन्मापासून मृत्यूपर्यत व्यक्ती विविध समूहात राहूनच जीवन जगते. जन्म त्याचा होते, व्यक्ती लहानाचा मोठा होत असताना प्रथम कुटुंब नंतर बालमित्र/ बालसंवगडी आणि शेजारी यांच्याशी संपर्क होतो. त्यानंतर मग शाळा, कॉलेज, जॉब/ नोकरीचे ठिकाण, बिजनेस ऑर्गनायझेशन, अश्या असंख्य लहान आणि मोठ्या आकारांच्या विविध समूहाशी व्यक्तीचा नेहमी संबंध हा येत असतो.
समाजशास्त्रज्ञांनी समूहातील सारखेपणा आणि भेद लक्षात घेऊन समूहाचे विविध प्रकार स्पष्ट केले आहे आहे
समूहाचे प्रकार | Types of social groups
1. प्राथमिक समूह | Primary Groups
अमेरिकेतील सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सी . एच् . कूले ( Charles Horton Cooley ) त्यांनी त्यांच्या Human Organization ( 1909 ) या ग्रंथात ‘Primary Groups’ ही संकल्पना सर्वप्रथम मांडली.
ज्या समूहात सदस्यांमधील परस्परसंबंध अत्यंत घनिष्ठ (intimate ) , समोरासमोरचे (face to face) , दीर्घकाळ टिकणारे (durable) आणि प्रामुख्याने सहकार्यावर आधारित (based on co-operation) असे असतात, त्या समूहाना कूले यांनी प्राथमिक समूह असे म्हटले आहे
उदा. कुटुंब ( family ) , मैत्री ( Friendship) , बालसंवंगडी (Play Groups), शेजारी (Neighbors) आणि जोडपे (A couple )
2. दुय्यम समूह | Secondary Groups
दुय्यम समूह संकल्पना प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध अशी आहे. याची व्याख्या पहिल्या की आपल्या लक्षात येईल.
ड्रेसलर आणि विलीस – “ज्या समूहातील सदस्यांमधील संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहाला ‘ दुय्यम समूह ‘ असे म्हणतात.”
ऑगबर्न आणि निमकॉफ –“जो समूह घनिष्ठतेचा अभाव असलेले अनुभव प्रदान करतो त्यास ‘दुय्यम समूह’ असे म्हणतात.” –
उदा. शाळा (School), राजकीय पक्ष (Political parties), बिजनेस ऑर्गनायझेशन (Business organizations) & कामाचे ठिकाण ( Work place)
3. अंतःसमूह | In-groups Groups
व्यक्ती ज्या समूहांची सभासद असते, म्हणजे ज्यात ती असते तो तिच्या दृष्टीने अंत:समूह (In – group ) होय.
उदा. एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबाची, महाविद्यालयाची, क्रीडासमूहाची सभासद असेल तर हे समूह तिच्या दृष्टीने अंत:समूह (In – groups ) होत. या समूहांविषयी व्यक्तीच्या मनात आपलेपणाची भावना असते, आम्हीची (We – Feeling ) भावना असते.
4. बाह्य समूह | Out-groups
व्यक्ती ज्या समूहांची स्वत: सभासद नसते ते तिच्या दृष्टीने ‘बहिःसमूह’ (Out – Groups) होत.
बाह्य समूहांबद्दल व्यक्तीच्या मनात तितकीशी आपलेपणाची भावना नसते. एवढेच नव्हे तर ते तिला ‘परक्यांचे समूह’ (They Group ) वाटतात.
उदा. आपण सर्व भारतीय एक आहोत अशी भारतीयांबद्दलची आपली भावना असते तर पाकिस्तान हा भारतीयांच्या दृष्टीने परक्यांचा समूह होय.
संदर्भ समूह | Reference group
वॉलेस आणि वॉलेस-“एखादी व्यक्ती स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी ज्या समूहाचा संदर्भ घेते त्याला संदर्भ समूह असे म्हणतात. (“A reference group is the group one refers to when one evaluates oneself.”).
उदा. एखाद्या समूहातील काही व्यक्ती, दुसऱ्या एका समूहाची प्रत्यक्ष सभासद होण्याची इच्छा बाळगून असतील तेव्हा दुसरा समूह पहिल्या समूहातील व्यक्तींचा संदर्भ समूह असतो उदाहरणार्थ- कमी उत्पन्न गटांतील व्यक्ती या जर मध्यम वर्गात जाण्याची इच्छा करीत असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या साठी मध्यम वर्ग हा संदर्भ समूह असतो.
If you’re keen to explore the various types of groups in sociology, watch our video here to gain insights into the diverse social structures and their roles in shaping human interactions and society.
FAQ on Social Group in Marathi | समूह आणि समूहाचे प्रकार यावरील प्रश्ने व उत्तरे
संदर्भ समूह | Reference group विविध व्याख्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा:- सामजिक समूह व्याख्या व वैशिष्ठ्ये | Definition and Characteristics of Social Group.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट येथे वाचा:- प्राथमिक व दुय्यम समूहाची वैशिष्ठ्ये | Primary & Secondary groups characteristics