सामजिक समूह व्याख्या व वैशिष्ठ्ये | Definition and Characteristics of Social Group.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात जन्मापासून मृत्यू पर्यत राहतो. समाजाशिवाय कोणताही माणूस एकाकी राहू शकत नाही. मानवाला त्यांचे संपूर्ण जीवन हे विविध समूहात राहूनच जगावे लागते. समूहाने राहणे हे आपल्या मानावोत्तर प्राण्यांमध्ये सुद्धा आढळते. यावरून आपल्याला समूहाचे महत्व लक्षात येईल. समूहात राहिल्यामुळे मानवाच्या मुलभूत गरजा या भागविल्या जातात. म्हणून या पोस्ट द्वारा आपण समूह किंवा सामजिक समूह ही समाजशास्त्रातील मुलभूत संकल्पना पाहणार आहोत.
सामजिक समूह म्हणजे काय? | What is social group?| समूह व्याख्या | social Group Definition
हरी जॉन्सन यांचे मते , ‘समाजशास्त्र हे समूहासंबंधीचे शास्त्र आहे.’ अशी व्याख्या त्यांनी समाजशास्त्राची केली आहे. ‘समूह’ हा शब्द आपणास सर्वांच्या परिचयाचा आहे. हा शब्द आपण अनेक गोष्टीचे एकत्रीकरण सांगतो. नेमके समाजशास्त्रात समूह किंवा सामजिक समूह कशाला म्हणतात यांची सोपी व्याख्या पाहू,
जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात तेव्हा सामाजिक समूह अस्तित्वात येतो अशी समूहाची व्याख्या केली जाते.
सामजिक समूह या संकल्पनेची विविध सामाजाशास्त्राज्ञानी केलेल्या व्याख्या वाचा
किमान दोन व्यक्ती असणे ही समूह अस्तित्वात येण्याची पूर्वअट आहे.
जर आपण समूह किंवा सामजिक समूह व्याख्या वाचल्या असतील तर आपल्याला समजेल की समूह बनविण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्ती असणे अनिवार्य आहे. समूह अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तीची आवश्यकता असते.
फक्त दोन व्यक्ती एकत्र आले म्हणजे समूह बनला का तर नाही. एकत्र आलेल्या व्यक्तीमध्ये दीर्घकाळ आंतरक्रिया व्हाव्या लागतात. अश्या अंतरक्रियेची जाणीव त्यांना लागते. त्यांना त्या अर्थपूर्ण आहे असे वाटावयास हवे.
आपण असे म्हणू शकतो की, दोन व्यक्तीचा समूह हा लहानात लहान सामाजिक समूह होय. त्याला इंग्रजीत Dyad असे म्हणतात, तर तीन व्यक्तींचा समूह त्याला Triad असे म्हणतात. जास्तीतजास्त समूहात किती सदस्य असायला हवे याला काही बंधन नाही, ते कितीही असू शकतात.
उदा. एखादे गाव, शहर आणि राष्ट्र हे देखील सामाजिक समूह होऊ शकतो.
सामजिक समूहाची वैशिष्टे | Characteristics of Groups
- समूहात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतात. ( Two and more than two persons.)
- समूहाचे समान हेतू ,ध्येय & समजूत असते. ( Common purpose, goal & understanding )
- समूहातील व्यक्तीमध्ये सामाजिक आंतरक्रिया घडते व त्याची सर्वाना जाणीव असते. ( Social interactions & awareness )
- समूहातील सदस्यांमध्ये सहकार्याची भावना असते. ( Co-operations )
- एकात्मतेची भावना असते. ( A feeling of unity (similar norms, values and expectations)
- समूहाला संरचना असते. ( Structure )
- समूहामधील संबंध हे सापेक्षता कायम किंवा टिकवू स्वरूपाचे असते. ( Relatively permanent contact among the members).
- समूहामध्ये परिवर्तनशीलता किंवा गतिशीलता असते. ( Dynamism )
If you’re eager to grasp the definition and essential characteristics of a social group, watch our video here to delve into the fundamental aspects that define these important units within society.
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट येथे वाचा:-समूहाचे प्रकार | Types of groups in sociology