समाजाचे प्रकार | Six Types of Society
मागील पोस्टमध्ये आपण समाज म्हणजे काय व त्यांची वैशिष्ट्ये पाहिले. या पोस्टद्वारे आपण समाजाचे विविध प्रकार पाहणार आहोत.
लाखो वर्षापूर्वीपासून मनुष्य हा पृथ्वीवर अस्तित्वात आहे. मानवी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर तो विकसित होत आलेला आहे. मानवी समाजाचे जगण्याचे मुख्य साधन व त्या संबंधित असलेले त्यांचे आर्थिक जीवन यांच्या आधारावर समाजाचे खालील सहा प्रकार पडतात.
समाजाचे प्रकार | Six Types of Society
1. शिकार आणि अन्न संकलन करणारा समाज (Hunting and food gathering society)
या समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे शिकार करणे व जंगलातील अन्नावर अवलंबून होते. जंगलावर आधारित या समाजाचे जीवन होते, आकाराने आणि समूहाने हा समाज लहान होता. त्यांच्या संपूर्ण गरजा या जंगलातून भागविल्या जात होते. फळे, फुले, कंदमुळे, मध अश्या इतर गोष्टीतून त्यांच्या दैनंदिन गरजा भागात होत्या. खूप प्राचीन काळी मानवी उत्क्रांती टप्प्यात हा समाज अस्तित्वात होता. आज ही आफ्रिका आणि अमेझानच्या घनदाट जंगलात असा समाज आढळतो.
2. बागायती समाज (Horticultural society )
बागायती समाजाचा शोध हा स्त्रियांनी लावला असे म्हणतात.या समाजामध्ये मानवी शक्तीचा आणि हाताने वापरायच्या साधनांचा वापर करून लोक हे बागा आणि शेती तयार करून जगत होते म्हणून या समाजाला बागायती समजा असे म्हणतात.
या प्रकारच्या समाजात फक्त गरजे पुरतेच उत्पादन घेतले जात होते. फक्त आपल्या समूहाच्या भागविण्यापुरते अन्न गोळा या समाजात केले जात होते.
3. पशुपालक समाज ( Pastoral society )
हा समाज हा पशुपालन आणि पशुसंवर्धन करून उदरनिर्वाह करीत असे. पशुपालन द्वारे या समाजाच्या सर्व मुलभूत गरजा या भागविल्या जात होत्या.
आपणास माहिती आहे की प्राण्यापासूनआपल्याला दुध मिळते, मास, रक्त, केस, हाडे , कातडी इत्यादीपदार्थ मिळतात. मास, रक्त, पोष्टिक अन्न म्हणून तो ग्रहण करीत असे, केस आणि कातडी यापासून तो थंडी पासून आपला बचाव करित आलेला आहे. शेणाचा उपयोग शेतीमध्ये करून जास्तीचे उत्पन्न तो घेत होता. प्राण्यांचा हाडांचा वापर सौंदर्य प्रसाधने आणि शिकारीसाठी हत्यारे यासाठी करीत होता. जनावरासाठी चार आणि पाणी असणाऱ्या भू-प्रदेशात हा समाजात मोठ्या प्रमाणात आढळत होता.
4. शेती व्यवसाय करणारा समाज ( agriculture society )
मानवी शक्ती वापराबरोबर प्राणी शक्तीचा वापर करून विविध साधनांचा जसे की नगरांचा उपयोग करून शेती करणाऱ्या समाजाला शेती व्यवसाय करणारे समाज असे म्हणतात. साधारणपणे हासमाज नदीच्या कडेला राहत होता. जेणेकरून पिकांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने. शेती करणाऱ्या समाजात जास्तीचे उत्पादन करून लोक विकत होते. नदीच्या किनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात लोकांचे संघटन झाले . कालांतराने मोठी मोठी शहरे व बाजारपेठा निर्माण झाल्या.
5. औद्योगिक समाज ( Industrial society )
या प्रकारच्या समाजामध्ये वस्तूच्या उत्पादनासाठी यंत्राचा, विविध तंत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कारखाना उत्पादन पद्धतीद्वारे वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. खास करून हा समाज औद्योगिक क्रांतीनंतर जगभरामध्ये उदयास आला असलेला दिसून येतो. आज भारतीय समाज हा औद्योगिक समाज म्हणून आपण ओळखू शकतो.
6. औद्योगिकोत्तर समाज ( Post -Industrial society )
या समाजातील अर्थव्यवस्था सेवाभिमुखी असते . जागतिकीकरणा नंतर हा समाज उदयास आले आहे. भारतात राज्यांच्या राजधानी आणि मेट्रो शहरात अश्या स्वरूपाची अर्थव्यवस्था आढळते. लोकांना घर बसल्या सर्व सुविधा घरी बसल्या मिळतात. Zomato, amazon, Google आणि इतर अश्या अनेक कंपन्या संपूर्ण देशाला व जगभरात त्यांच्या विविध सेवा पुरवितात.
विशेष करून हा समाज तंत्रज्ञानात्मक प्रगतीवर अवलंबून आहे. या समाजाला नवउदार समाज असेही म्हटले जाते. या समाजामध्ये संपूर्ण जग ही बाजारपेठ समजली जाते.आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन दिले जाते.
If you’d like to learn with video in English of Types of Society, watch the below video
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट:- समाज| Samaj mhanje kay |What is Society | Characteristics of Society