समाजशास्त्रीय दृष्टीकोन | What is Sociological Perspective | Major Perspectives in Sociology
समाजशास्त्रीय दृष्टीकोन समजून घेताना, प्रथम आपण दृष्टीकोन ( Perspective) म्हणजे काय ते पाहू. आपण एखाद्या गोष्टींकडे कसे पाहतो, ( The way how we look at the things) याला उद्देशून हा शब्द वापरला जातो.
प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा व्यक्तीची स्वतःची एक वेगळी दृष्टी व अंगल (angle) असतो. प्रत्येक माणूस जगाकडे वेगवेगळ्या नजरेने पाहत असतो. व्यक्ती वेगळ्यापद्धतीने ज्या गोष्टीकडे बघतो, त्यांच्या बघण्यातील फरकाला वैज्ञानिक भाषेत ‘दृष्टीकोन’ असे म्हणतात.
दृष्टिकोन म्हणजे काय? | What is Perspective
दृष्टिकोन एक अशी स्थिती आहे, ज्याद्वारे वास्तवाचे निरीक्षण केले जाते आणि त्याचा अर्थ लावला जातो. एक उदाहरणाद्वारे आपण ‘दृष्टीकोन’ या शब्दाचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊयात.
तुम्हांला सहा आंधळ्यांची गोष्ट नक्कीच माहिती असेल. प्रत्येक अंध व्यक्तीला विचारले गेले की त्यांच्या मते हत्ती कसा असतो?
प्रत्येक आंधळ्याने हत्तीचे सोंड, कान, दात, शेपटी, पोटाला, पाय पकडले आणि त्याप्रमाणे त्यांनी हत्तीचे वर्णन केले.
- हत्तीच्या सोंडेला स्पर्श करणाऱ्याला हत्ती नांगराच्या दांड्यासारखा वाटला.
- कानाला स्पर्श करणाऱ्याला सुपासारखा वाटला.
- दाताला स्पर्श करणाऱ्याला खिळ्यासारखा वाटला.
- शेपटीच्या गोंड्याला स्पर्श करणाऱ्याला केरसुणीसारखा वाटला.
- पोटाला स्पर्श करणाऱ्याला धान्य भरलेल्या पोत्यासारखा वाटला.
- तर पायाला स्पर्श करणाऱ्याला हत्ती खांबासारखा वाटला.
दृष्टीकोन हा एखाद्या अभ्यासाच्या विषयाची सीमा, परिघ आणि अभ्यास विषय परिभाषित करतो.
स्पर्श करून त्यांना जे वाटले त्याचे वेगळे वर्णन सहा अंधांनी केले. प्रत्येक व्यक्तीने हत्तीची स्वतःची व्याख्या दिली. येथे प्रत्येक अंधांनी स्पर्श केलेला हत्तीचा एक अवयव म्हणजे जणूकाही संपूर्ण हत्ती आहे असे त्यांना वाटले होते. मात्र मुळात हत्ती तसा नव्हता. व्यक्ती हा जगाकडे व अनेक गोष्टीकडे पाहतो आणि अर्थ लावतो, वर्णन करतो आणि त्याप्रमाणे व्याख्या करतो. ते हत्तीच्या एक एक अवयवांप्रमाणेच ते वर्णन करतात.
वरील उदाहरणतून आपण असे समजू शकतो की, एखादी विशिष्ट गोष्ट किंवा घटना वेगवेगळ्या कोनातून कशी पाहिली जाऊ शकते. अशा प्रकारे, दृष्टीकोन हा एखाद्या अभ्यासाच्या विषयाची सीमा (boundary), परिघ (periphery) आणि अभ्यास विषय ( the subject matter) परिभाषित किंवा स्पष्ट करतो.
समाजशास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय | What is Sociological Perspective
आतापर्यत आपण दृष्टीकोन म्हणजे काय हे पहिले. आता आपण समाजशास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे काय हे सोप्या भाषेत पाहूयात. प्रथम आपण ‘समाजशास्त्रीय’ या शब्दाचा अर्थ पाहूयात. समाज आणि शास्त्रीय या शब्दांच्या संधी पासून समाजशास्त्रीय हा शब्द तयार झाला आहे.
समाजशास्त्रामध्ये जेव्हा एखादी संकल्पना वापरली जाते, तेव्हा त्या संकल्पनेला एक निश्चित आणि सुस्पष्ट असा शास्त्रीय अर्थ असतो. शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून पडताळणी केलेल्या संकल्पना यांचा निर्देश करण्यासाठी समाजशास्त्रीय शब्द वापरला जातो. दैनंदिन व्यवहारामध्ये जसे शब्दांना अर्थ असतो तसे समाजशास्त्रीय शब्दांना किंवा संकल्पनांना नसतो. समाजशास्त्रीय दृष्टीकोन म्हणजे शास्त्रीय पद्धतीने दृष्टीकोन ठेऊन सामाजिक घडामोडीचे केलेले निरीक्षण होय.
पीटर बर्जर, यांनी त्यांच्या ‘Invitation to Sociology’ या पुस्तकात समाजशास्त्रीय दृष्टीकोन हे समाज आणि सामाजिक वर्तनाकडे पाहण्याचा मार्ग एक आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीकोनात लोकांच्या कृती आणि संघटनांचे बाह्य स्वरूप पाहणे समाविष्ट आहे. हा समाजशास्त्राचा हा अभ्यास विषय आहे असे ही त्यांनी सांगितले आहे.
समाजशास्त्रातील या दोन प्रमुख दृष्टिकोन | Major Two Perspectives in Sociology
- अनुभववादी किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन (Empiricist or scientific perspective )
- मानवतावादी दृष्टीकोन (Humanistic perspective )
अनुभववादी किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन | Empiricist or scientific perspective
अनुभववादी किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन हा समाजशास्त्रात मनुष्य आणि समाजाच्या अभ्यासासाठी विज्ञानाच्या पद्धती लागू करण्याचा प्रयत्न करतो. प्रायोगिकरित्या सत्यापित ज्ञान प्राप्त करणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भौतिक किंवा नैसर्गिक जगाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धती आणि सामाजिक जगाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणार्या पद्धतींमध्ये फरक नाही. समाजशास्त्र हे एक “शुद्ध” विज्ञान आहे, म्हणजेच मूल्य-मुक्त वैज्ञानिक पद्धतीने ज्ञानाचा शोध घेतो.
अनुभववादी किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन मानणारे अनुयायी
एमिल दरखीम, लुंडबर्ग, टॅलकॉट पार्सन्स, के. डेव्हिस, आर.के. मेर्टन आणि पॉल लाझार्सफेल्ड.
मानवतावादी दृष्टीकोन | Humanistic perspective
मानवतावादी दृष्टीकोन समाजशास्त्रज्ञ, जे मानवतावादी दृष्टीकोनावर विश्वास ठेवतात. त्यांना मानवी कल्याण, मूल्ये आणि विचार-आचार यामध्ये स्वारस्य आहे. मानवतावादीसाठी एक अंतिम ध्येय म्हणजे स्वत:ची जाणीव (self-realization ) आणि सुसंस्कृत माणसाचा पूर्ण विकास (full development of the cultivated man ) हे आहे.
मानवतावादी मानतात की, मानवी सामाजिक जग हे नैसर्गिक जगापेक्षा वेगळे आहे. परिणामी, नैसर्गिक विज्ञानाच्या पद्धती आणि गृहीतके मनुष्य आणि समाजाच्या अभ्यासासाठी अयोग्य आहेत असे त्यांचे मत आहे. नैसर्गिक विज्ञान पदार्थांशी संबंधित आहे. पदार्थांना कोणताही अर्थ नसते. , अर्थ नसते तसेच त्यांना भावना आणि हेतू नसतात. पदार्थ फक्त नकळतपणे ‘बाह्य उत्तेजनांवर प्रतिक्रिया देतो. परंतु मनुष्याला चेतना असते. विचार, भावना, अर्थ, हेतू आणि अस्तित्वाची जाणीव ही असते. त्यामुळे त्याची कृती अर्थपूर्ण असते. परिणामी, तो केवळ भौतिक पदार्थासारख्या बाह्य उत्तेजनांवर प्रतिक्रिया देत नाही तर, तो कार्य करतो. तो त्याला अनेक अर्थ जोडतो आणि हे अर्थ त्याच्या कृती निर्देशित करतात.
मानवतावादी दृष्टीकोन मानणारे अनुयायी
सी.डब्ल्यू. मिल्स, आल्फ्रेड मॅकक्लंग ली, पीटर बर्जर, रॉबर्ट निस्बेट
हेही वाचा:-समाजशास्त्राचे स्वरूप | Nature of Sociology