फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम | फ्रेंच राज्यक्रांती भाग -5 | French Revolution Part-5
मागील पोष्टमध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे पहिले. या पोस्टद्वारे आपण फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम समजून घेणार आहोत.
राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार करून लोकशाहीची स्थापना केली.
राष्ट्रीय सभेने फ्रान्ससाठी नवी राज्यघटना तयार केली. यात राजाचे पद वंशपरंपरागत ठेवण्यात आले. सत्ता विभाजनाचे तत्व मान्य करण्यात आले. ती कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तीन शाखेत स्वायत्त ठेवण्यात आल्या.
फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय? | What is the French Revolution?
फ्रान्समध्ये सरंजामशाहीतील पारतंत्र्य, विषमता, जुलमी राजवट हे नवीन राज्यघटनेद्वारे नष्ट करून स्वातंत्र्य, समता व बंधुता वर आधारित लोकशाहीची स्थापना करून सरंजामशाहीला मूठमाती देण्यात आली आहे. याच फ्रेंच राज्यक्रांती म्हणून संबोधले जाते..
सन १७८९ मध्ये फ्रान्समधील १६ व्या लुईच्या राज्याविरुद्धचा एक राजकीय उठाव यापेक्षा फ्रेंच राज्यक्रांतीला वेगळी व्यापक ओळख आहे. समाजजीवनाच्या अनेक बाजूंवर या प्रभाव टाकला होता.
राजकीय क्षेत्रांत, सामाजिक संस्थांमध्ये व सामाजिक संबंधांमध्ये मूलभूत परिवर्तन घडविण्याची प्रेरणा सुधारणा-ज्ञानोदयाने दिली होती; याच पार्श्वभूमीवर अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांत्या उदयाला आल्या. फ्रान्समधली तात्कालिक स्थितीही त्याला कारणीभूत होती. तेथील असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर विचारवंतांनी आपले साहित्य, व्याख्याने, जाणिवजागृती याआधारे फ्रेंच राज्यक्रांती आकाराला आणली.
फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम
१. राजकीय परिपक्वता फ्रेंच जनतेत आली.
२. धर्मनिष्ठेच्या, कर्मकांडांच्या प्रभावातून, दैवदत्त वर्चस्वातून बाहेर येण्याची प्रक्रिया घडून आली.
३. सामाजिक विषमता, पिळवणूक, यांच्या विरोधी शिक्षण देणे अशा अनेक बाबतीत रचनात्मक परिवर्तनाला, नवजाणिवा यांना चेतना देण्याचे काम फ्रेंच राज्यक्रांतीने केले.
४. भौतिक विकासासोबत वैचारिक, मूल्यात्मक पातळीवर मूलभूत परिवर्तन घडण्यास मदत झाली.
५. फ्रेंच जनतेची राजकीय स्वातंत्र्य मिळाले की, हक्काधिकार प्राप्त होतात आणि चांगले जीवन स्वातंत्र्य आणि आनंद प्राप्त होतो अशी आशा धारणा लोकमानसात रुजली गेली.
६. अनेक विचारवंत व अभ्यासकांनी सांगितले की – फ्रेंच राज्यक्रांतीने समाजात आणलेले परिवर्तन इतके महान होते की, त्याने सर्व मानवजातीलाच नवचैतन्य दिले.
७. या राज्यक्रांतीने केवळ १६ व्या लुईची जुलमी राजवट संपवली नाही तर सरंजामशाही, राजेशाही संपविण्यात हातभार लावला. अमीर-उमरावांचे वर्चस्व व महत्त्व कमी केले.
८. कुटुंब, धर्म, विवाह, कायदा, शिक्षण अशा संस्थांमध्ये रचनात्मक बदल घडविले. यामुळे त्यांच्यावरील सनातन धर्मप्रभाव घटला.
९.व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकत्व, अर्जित कर्तृत्व, शिक्षण आणि आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची संधी प्राप्त झाली.
१०. नव्या राजकीय व सामाजिक-आर्थिक व्यवस्थांचा उदय झाला.
११. स्वातंत्र्य, समता-बंधुता यांसारख्या आधुनिक मूल्यांना उजाळा मिळाला.
१२. विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा विकास होऊ लागला.
वरील पोस्ट संदर्भातील मागील पोस्ट वाचा:-फ्रेंच राज्यक्रांतीची राजकीय कारणे | फ्रेंच राज्यक्रांती भाग -4 | French Revolution Part-4