समाजशास्त्राची व्याख्या | What is sociology | Definition of sociology
Sociology ला मराठीमध्ये समाजशास्त्र असे म्हणतात. समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. त्यांचा उदय हे युरोप मध्ये 19 शतकात झाला. समाजशास्त्राचा जनक ( Father of Sociology ) म्हणून ऑगस्ट कॉम्त (Auguste Comte) यांना ओळखले जाते. त्यांनी सन १८३८ मध्ये पहिल्यांदा ‘समाजशास्त्र'(Sociology) हा शब्दप्रयोग केला. हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या एका अ डिसकोर्स अन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी (A Discourse on Positive Philosophy) या पुस्तकात केला होता. या पोस्टद्वारे जाणून घ्या-विविध समाजशास्त्राची व्याख्या
समाजशास्त्राचा अर्थ | समाजशास्त्र शब्दाचा उगम | Meaning of Sociology
Sociology हा शब्द Socious+Logos या संकरीत दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ -(Study of human association ) थोडक्यात Sociology = Socious ( Latin )+ logos (Greek ).
लॅटिन भाषेतील ‘ Socius ‘ म्हणजे सहचर ( Companion )
ग्रीक भाषेतील logos ‘ म्हणजे शास्त्र किंवा उच्च पातळीवरील अभ्यास
व्युत्पतिशास्त्रदृष्ट्या ‘समाजशास्त्र’ या शब्दाचा अर्थ
मानवा मानवातील साहचर्याचा अमूर्त पातळीवरील अभ्यास करणारे शास्त्र. साहचर्या म्हणजे संबध किंवा सहचर.
समाजशास्त्र हे मानवी समाजाचे अभ्यास करणारे शास्त्र आहेत.
शब्दकोश मधील समाजशास्त्र या शब्दाचा अर्थ
मानवी समाजाचा, त्यांच्या उत्क्रांतीचा, संरचनेचा, सामाजिक संबंधाचा आणि सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र होय.
मॅकायव्हर आणि पेज यांची समाजशास्त्र व्याख्या | MacIver and Page ‘s definition of sociology
“सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय होय.” (“The a subject-matter of Sociology is social relationship”)
हॅरी जॉन्सन यांची समाजशास्त्र व्याख्या | Harry Johnson’s definition of sociology
“समाजशास्त्र हे सामाजिक समूहांसबंधीचे शास्त्र आहे.” (“Sociology is the science that deals with social groups”)
हॉर्टन आणि हंट यांची समाजशास्त्राची व्याख्या | Horton and Hunt’s definition of sociology
“मानवी सामाजिक जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय . (“Sociology is the scientific study of human social life” )
अलेक्स इंकेल्स याची समाजशास्त्राची व्याख्या | Alex Inkeles’s definition of sociology
“सामाजिक क्रिया व्यवस्थांचा आणि त्यामधील आंतरसंबंधांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” (“ Sociology is the study of systems of social action and of their interrelations”)
टिशलेर , व्हायटन आणि हंटर यांची समाजशास्त्र व्याख्या | Tischler, Whitten & Hunter’s definition of sociology
“मानवी समाजाचा आणि मानवा-मानवात होणाऱ्या सामाजिक आंतरक्रियांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय” (“Sociology is the scientific study of human society and the social interactions that emerge among people”)
मॉरिस गिन्सबर्ग याची समाजशास्त्राची व्याख्या | Morris Ginseberg’s definition of sociology
“व्यापक अर्थाने, मानवी आंतरक्रिया व आंतरसंबंध, त्यांची कारणे आणि परिणाम यांचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय.” ( “In the broadest sense, sociology is the study of human interactions and interrelations, their conditions and consequences.”)
मॅक्स वेबर याची समाजशास्त्राची व्याख्या | Max Weber’s definition of sociology
“सामाजिक क्रियांचे अर्थापनात्मक आकलन करण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय.” (“Sociology is the science which attempts the interpretative understanding of social action” )
किंग्जले डेव्हिड याची समाजशास्त्राची व्याख्या | Definition of Sociology by Kingsley Davis
” समाजशास्त्र हे समाजाविषयीचे सामान्य विज्ञान आहे.” ( “Sociology is a general science of society”).
If you’re interested in learning more about ‘What is sociology’ and its definition, you can watch our informative video here.
वरील पोस्ट संदर्भातील पुढील पोस्ट वाचा:- समाजशास्त्राचे स्वरूप | Nature of Sociology
हे ही वाचा जाणून घ्या समाजशास्त्राच्या उदयाची कहाणी.