राज्यसंस्था | Polity As Social Institution,
राज्यसंस्था हि एक मुलभूत सामाजिक संस्था आहे. मानवी जीवनाच्या व समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असते . समाजात कायद्याद्वारे शांतता, सुव्यवस्था राखण्याचे काम हि संस्था करते.
राज्यसंस्था अर्थ | Meaning of Polity
राज्यसंस्था म्हणजे राजकीयदृष्ट्या संघटित असणारा समाज ( a politically organized society) होय. जसे की एखादे राष्ट्र, शहर किंवा चर्च त्याचे सरकार आणि प्रशासन होय.
राज्यसंस्था अर्थ -हे सरकारचे रुप किंवा प्रकार किंवा संघटना असते. जी लोकांचे सार्वजनिक किंवा नागरी व्यवहारांचे व जीवनाचे व्यवस्थापन करण्याचे काम हि संस्था करते.
राज्यशास्त्र शब्दकोश मधील राज्यसंस्था यांची केलेली व्याख्या
राज्यसंस्था मुख्यतः शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता राखण्यासाठी स्थापन झालेली दंडशक्ती वर आधारलेल्या कायद्याद्वारे विशिष्ट भूप्रदेशात आपले सार्वत्रिक अधिकारक्षेत्र प्रत्यक्षात आणणारी, सार्वभौम सत्ता म्हणून मान्यता असणारी संघटना. अशी राज्यसंस्था यांची व्याख्या राज्यशास्त्र शब्दकोश मध्ये सांगण्यात आलेली आहे.
राज्यसंस्थेची वैशिष्टये
राज्यसंस्था ही विशिष्ट भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांवर राज्य करते.
अश्या राहणाऱ्या लोकांना राज्यसंस्थेचे सभासदत्व अनिवार्य असते.
राज्यासंस्थेला लोकांची मान्यता असते.
राज्य संस्थेने केलेले कायदे त्यांना पाळावेच लागतात.
या कायद्यांच्या मागे दंड शक्ती (Legitimate Power ) उभी असते.
राज्यसंस्थेला अंतिम व सर्वोच्च अधिकार असतो म्हणजेच राज्यसंस्था सार्वभौम असते.
राज्यसंस्था मुख्यत : समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम करते.
बाह्य शत्रूपासून सुरक्षितता प्रदान करण्याचे काम राज्यसंस्थेला करावे लागते.
वरील सर्व कार्ये राज्यसंस्थेच्या मार्फत काम करणारी यंत्रणा म्हणून शासन व्यवस्था काम पाहत असते.
राज्यसंस्थेचे प्रकार | Forms of Polity |Types of Polity
राजेशाही |Monarchy
राजेशाही हे एक राज्यसंस्थेचा प्रकार आहे. यामध्ये राजा किंवा राणी यांच्याकडे संपूर्ण सत्ता असते. एका व्यक्तीकडे देशाची सत्ता असते. प्राचीन काळी हा प्रकार अस्तित्वात होता.
ज्या राजघराण्याची सत्ता असते त्या एका कुटुंबातील प्रतिनिधी सरकारवर नियंत्रण ठेवतो आणि त्या कुटुंबातून पिढ्यानपिढ्या सत्ता हस्तांतरित केली जाते.
राजेशाही दोन प्रकार पडतात.
संपूर्ण राजेशाही
या प्रकारच्या राजेशाहीमध्ये राजा, राणी, सम्राट किंवा सम्राज्ञी असते. सत्ता हि वारसा हक्काने त्यांना मिळते. राजघराण्यातील कुटुंबातील सदस्यांकडून दिली जाते. राजाकडे पूर्ण शक्ती असते म्हणजे ते कोणाशीही सल्ला न घेता सर्व निर्णय घेऊ शकतात. सर्वोच्च सत्ता एका शासकाच्या हातात असते. (ब्रुनेई, ओमान, सौदी अरेबिया आणि व्हॅटिकन सिटी.)
उदा. – 1. स्विझर्लंड 2. सौदी अरेबिया 3. ओमान 4. व्हॅटिकन सिटी
संवैधानिक राजेशाही
जगातील बहुतेक देशात संवैधानिक राजेशाही आहेत, ज्यामध्ये राजघराण्यातील राज्य करणारा सदस्य राज्याचा प्रतीकात्मक प्रमुख असतो परंतु निवडून आलेले अधिकारी प्रत्यक्षात शासन करतात.
अनेक युरोपीय देशांमध्ये घटनात्मक राजेशाही आज हि अस्तित्वात आहेत.
उदा.- ग्रेट ब्रिटन.
• युनायटेड किंगडम • न्यूझीलंड • कॅनडा • जमैका या कॉमनवेल्थ राष्ट्रांसह
हुकुमशाही | Authoritarianism / Dictatorship
हुकूमशाही हा सरकारचा एक प्रकार आहे ज्यामध्ये संपूर्ण एक व्यक्तीचा देश किंवा राज्यावर पूर्ण अधिकार असतो. हुकुमशाही मध्ये एका व्यक्तीकडे देशाची सत्ता असते. तो जे सांगेल ते सर्वांनी ऐकावे लागते.
ही एक असा शासन प्रकार किंवा राजकीय व्यवस्था आहे कि ज्यामध्ये नागरिकांना सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ दिले जात नाही.
हुकुमशाहीची वैशिष्ट्ये
१. सरकारचा एक प्रकार ज्यामध्ये निरंकुश सत्ता हुकूमशहाकडे केंद्रित असते.
२. सरकार एका व्यक्तीच्या नियंत्रणाखाली आहे
३. वारसाहक्क मिळवण्यापेक्षा सैन्य शक्तीने सत्ता मिळवली जाते.
४. अनेकदा सैन्य किंवा फोर्स मधील व्यक्तीच सदस्य होते
५. त्यांच्या शक्तीवर मर्यादा नाहीत. मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जातात. लोकांची मागणी किंवा निर्णय हे दुय्यम ठेवले जाते.
६. परकीय आक्रमण व राष्ट्रभक्ती जन्म घेते.
उदा- 1) अडॉल्फ हिटलर – नाझी जर्मनी, २) सद्दाम हुसेन – इराक
लोकशाही | Democracy
लोकशाही हा एक सरकारचा प्रकार आहे. ज्यामध्ये सर्वोच्च सत्ता हि लोकांच्या हातात असते. आणि प्रतिनिधित्व प्रणालीद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सरकार काम करीत असते. प्रतिनिधित्व हे निवडणूक द्वारे निवडले जाते.
सत्ता सर्व लोकांद्वारे लोकप्रतिनिधी यांना सोपवली जाते. “लोकांद्वारे सरकार” बनविले जाते. मागच्या दोन शतकात खऱ्या अर्थाने लोकशाही सरकारांची भरभराट झाली आहे. फुललेली आहेत.
अब्राहम लिंकन कृत व्याख्या: लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. (Abraham Lincoln said “Democracy is for the people, by the people and of the People.’’)
लोकशाहीचे दोन प्रकार | Forms of democracy
थेट लोकशाही | Direct Democracy
थेट लोकशाही याला ‘शुद्ध लोकशाही’ असे सुद्धा म्हणतात. यामध्ये लोक सर्व मुद्द्यांवर मत देतात. अश्या लोकशाहीचा प्रकार फार क्वचित अस्तित्वात आहे.
प्रातिनिधिक लोकशाही | Representative Democracy
प्रातिनिधिक लोकशाहीचे परत दोन प्रकार पडतात.
- संसदीय ( Parliamentary)
- अध्यक्षीय (Presidential)
संसदीय लोकशाही मतदार संसदेसाठी (विधिमंडळ) सदस्यांची निवड करतात. ही राजकीय व्यवस्था संसद सर्वोच्च आहे या कल्पनेवर आधारित आहे. लोक नियमित निवडणुकांमध्ये प्रतिनिधी निवडतात उदा. भारत
अध्यक्षीय लोकशाही मध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी अध्यक्षाची निवड करतात.आणि त्यांना मुद्द्यांवर मतदान करण्याचा अधिकार देतात. (संयुक्त राष्ट्र)
उदा.- युनायटेड स्टेट्स
निरंकुशाही | Totalitarianism
निरंकुशशाही ही एक राजकीय व्यवस्था आहे. ज्या अंतर्गत सरकार नागरिकांच्या जीवनातील जवळजवळ सर्व घटकांवर कडक नियंत्रण ठेवते. व्यक्तीस्वतंत्र्य, अभिव्यक्तीला स्वतंत्र्य लोकांना दिले जात जात नाहीत.
अश्या प्रकारचे सरकार हे दैवी शक्ती असणाऱ्या नेत्याद्वारे चालवले जाते. बहुतांश लोक हि अश्या नेत्यास मानतात आणि त्यांच्याकडेच अंतिम अधिकार असते. नागरिकांच्या जीवनातील सर्व पैलू राज्याच्या अधिकाराच्या अधीन असते.
निरंकुशशाही देशात एकच राजकीय पक्षाद्वारे देश चालविला जातो. यामध्ये आपल्याला चीन किंवा उत्तर कोरिया यांचे उदाहरण देता येईल.
लोकांच्या सामाजिक जीवनात सरकारांचा जास्त हस्तक्षेप असतो. सरकार लोकांना देश सोडण्यासह काहीही करण्यापासून रोखू शकते.