FGD म्हणजे काय? | FGD in Marathi | Focus Group Discussion in Marathi.
फोकस ग्रुप डिस्कशन (FGD) ही एक गुणात्मक संशोधन पद्धत आणि डेटा संकलन तंत्र आहे. यामध्ये एकाच युनिवर्स अथवा पार्श्वभूमीतून निवडलेला एक लोकांचा गट असतो आणि प्रशिक्षित अश्या बाह्य फॅसिलिटेटरद्वारे किंवा मॉडरेटरद्वारे दिलेल्या विषयावर किंवा समस्येवर सखोल चर्चा घडून माहिती गोळा केली जाती.
गटात चर्चा सुरु असताना फॅसिलिटेटरने गटाच्या गतिशीलतेची निरीक्षणे, त्यांची फोकस गटातील प्रश्नांची उत्तरे आणि त्यांची देहबोली देखील पाहणे आवश्यक आहे. कारण गटांतील सदस्य हे समुदायांच्या सामाजिक, आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक घटकांचे प्रतिबिंबित करीत असतात. ते आपल्या संशोधनास मार्गदर्शन ठरू शकते.
FGD म्हणजे काय?
FGD म्हणजेच त्याचे full फॉर्म हा Focus Group Discussion असे होते.
विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी यामध्ये जवळपास किमान 6-8 आणि कमाल १०-१२ लोकांना एकत्र करून चर्चा घडून माहिती मिळवली जाते.
गट चर्चेमध्ये सहभागी सर्व लोक हे समान पार्श्वभूमीतील असले पाहिजेत म्हणजेच, वय अनुभव, समाज, संस्कृती, भाषा, शिक्षण आणि समज त्यांची सारखी असणे आवश्यक आहे. अश्या सहभागी गटाला मार्गदर्शन करण्यासाठी फॅसिलिटेटर किंवा मॉडरेटर ची आवश्यकता असते.
फॅसिलिटेटर हा चर्चेसाठी असणाऱ्या विषयांचा परिचय करून देतो आणि चर्चा व्यवस्थित जिवंत व नैसर्गिक पद्धतीने घडवून आणण्यासाठी गटाला मदत करतो. FGD तून वैयक्तिक मुलाखतींपेक्षा अधिक सूक्ष्म आणि नैसर्गिक अभिप्राय मिळू शकतात.
गटात एखाद्या सद्स्याकडून मांडलेल्या मतावर आणि मांडणीवर सहमती व काहींची असहमती असते. असे होणे याला आपण FGD ची खरी ताकद म्हणतो कारण एखाद्या समस्येबद्दल, मत आणि कल्पनांबाबत गट कसा विचार करतो याची अंतर्दृष्टी समजते.
FGDs चा उपयोग सर्वेक्षण निष्कर्षांचा अर्थ शोधण्यासाठी केला जातो. FGDs द्वारे मिळालेल्या माहितीचे सांख्यिकीयदृष्ट्या स्पष्टीकरण करता येत नाही,
विशिष्ट विषयावरील मते (pinions/views) आणि स्थानिक स्तरावरील अस्तित्वात असलेल्या अनेक सवयी आणि अनुभव व जीवनपद्धती संदर्भातील माहिती एकत्रित करण्यासाठी FGD हे साधन उपयुक्त ठरते.
प्रश्नावली तयार करण्याआधी जर आपण FGD द्वारे प्रश्नावली मध्ये अपेक्षित असणाऱ्या प्रश्नावर जर चर्चा घडून आणली तर चांगले प्रश्न तयार होऊ शकतात. प्रश्नावली तयार करण्यासाठी FGD एक चांगली पद्धत आहे.
FGD कसे घडवून आणाल | प्रक्रियेची तपशीलवार रूपरेषा
बैठकीची उद्दिष्टे ठरविणे
सर्वात प्रथम आपण, ज्या विषयावर फोकस गट चर्चा घडवून आणावयाचे आहे, त्या विषयाला धरून करणाऱ्या बैठकीची उद्दिष्टे ठरविणे महत्वाचे आहे. ही उद्दिष्टे ठरवताना ही संशोधन / सर्वे अभ्यासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावे.
मुख्य प्रश्न तयार करणे
बैठक उद्दिष्टे यांना विचारात घेऊन मुख्य प्रश्न तयार करणे.
बैठक अजेंडा
त्यानंतर बैठकीचा अजेंडा तयार करणे.यामध्ये वेळ, ठिकाण आणि विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा यांचा समावेश असावे.
ऑडीओ आणि व्हिडीओ दस्तेवाजीकरण
नंतर संपूर्ण सत्राचे ऑडीओ आणि व्हिडीओ द्वारा रेकॉर्ड करायचे याचे नियोजन करणे आवश्यक असते.
FGD कालावधी कमीत कमी ४० ते ६० मिनिटे
आयडियली फोकस गट चर्चा ही कमीत कमी ४० ते ६० मिनिटे होणे आवश्यक आहे.
FGD सहभागी संख्या किमान 6-8 आणि कमाल १०-१२
जेव्हा या गोष्टी संपूर्ण होतील मग पुढील पायरी ती म्हणजे योग्य अश्या सहभागींना ओळखणे आणि त्यांना फोकस गट चर्चा करिता आमंत्रित करणे. आयडियली जसे आधी कळवल्याप्रमाणे कमीत कमी 6-8 आणि जास्तीतात जास्त १०-१२ लोकांना असणे योग्य मानले जाते.
FGD मधील महत्त्वाचा घटक म्हणजे फॅसिलिशन करणारा व्यक्ती ज्या आपण फॅसिलिटेटर किंवा मॉडरेटर म्हणतो.
फॅसिलेशन करताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात आवश्यक आहे.
FGD मधील महत्त्वाचा घटक म्हणजे फॅसिलिशन करणारा व्यक्ती ज्या आपण फॅसिलिटेटर किंवा मॉडरेटर म्हणतो. गट चर्चा घडवून आणताना मात्र फॅसिलिटेटरला खलील मुद्यावर लक्ष ठेऊन राहावे लागते.
व्यक्तींचे सहभाग सुनिश्चित करणे
यामध्ये गटांतील प्रत्येक व्यक्ती सहभाग कसे घेईल हे पाहावे. सर्वाना बोलते ठेवावे.
मुख्य प्रश्नांचे काळजीपूर्वक शब्दांकन करणे,
सोप्या आणि समजेल अश्या भाषेत प्रश्न असले पाहिजे. प्रश्नातून दोन अर्थ निघू नये. प्रश्नातून अपेक्षित उत्तर मिळेल असेच प्रश्न तयार करावे.
तटस्थ दृष्टीकोन राखणे
कोणास ही फेवर करून नये. कोणावर ही प्रभाव टाकू नये. सर्वांचे मत ऐकून घ्यावे.
समान रीतीने आणि निष्पक्षपणे.
सहभागी कडून मिळालेल्या विविध मतांचे प्रतिबिंबित करण्यासाठी सत्राचा सारांश करणे. सर्वांचे शेवटी आभार मांडणे.
गट चर्चा संपल्यानंतर सविस्तर अहवाल तयार करणे.
गट चर्चे दरम्यान कोणतीही निरीक्षणे, अनुभव लक्षात घेऊन सत्राची नोंद घेऊन ते अहवालात समाविष्ट करणे.
FGD- फोकस गट चर्चेचा परिचय करून देताना करावयाच्या गोष्टी
फॅसिलिटेटर किंवा मॉडरेटर यांनी गट चर्चेचा परिचय करताना पुढे गोष्टी केल्या पाहिजेत
१) सर्वांचे प्रथम स्वागत करणे.
2) विषयाचे विषयाची प्रस्तावना करणे.
3) गट चर्चे बाबतचे काही नियम असतील तर ते सर्वाना सांगणे.
४) पहिला प्रश्न चर्चेस ठेवणे.
प्रकारचे प्रश्न संच असू द्यावेत.
1. सुरुवातीचा प्रश्न (Opening Question)
2. प्रास्ताविक प्रश्न (Introductory Question )
3. संक्रमण प्रश्न (Transition Questions)
4. प्रमुख प्रश्न (Key Questions)
5. शेवटचे प्रश्न (Ending Questions)