कुटुंबांचे प्रकार | Type of Family
कुटूंब म्हणजे आई-वडील आणि त्यांची मुले यांच्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या परस्पर संबंधाची व्यवस्था होय, अशी व्याख्या कुटुंबांची क्लरे यांनी व्याख्या केलेली आहे. मागील पोष्ट मध्ये आपण विविध कुटुंबांची व्याख्या पहिल्या. या पोष्ट मध्ये आपण कुटुंबांचे विविध प्रकार पाहणार आहोत.
कुटुंबांचे विविध प्रकार | Different types of families
कुटुंबांचा आकार म्हणजेच कुटुंबातील सदस्य संख्येवर किंवा /संरचनेच्या आधारावर कुटुंबांचे दोन प्रकार पडतात. | On the basis of Size / Structure
संयुक्त कुटुंब किंवा विस्तारित कुटुंब | Join Family or Extended family
दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिढीतील लोक जेव्हा एकत्र राहतात. त्याला संयुक्त कुटुंब म्हणतात. दोन विभक्त कुटुंब एकत्र आले कि संयुक्त कुटुंब बनते.
विभक्त/आधुनिक/प्राथमिक कुटुंब | Nuclear / modern/primary family
हे कुटुंब पती, पत्नी व त्यांची मुले यांनी मिळून बनतो. मुलांसह किंवा नसलेले.
अधिकाराच्या आधारावर कुटुंबांचे दोन प्रकार पडतात | On the basis of Authority
पितृसत्ताक कुटुंब पद्धती | Patriarchal
या प्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये घरातील प्रमुख व्यक्ती ही पुरुष असते. सर्व निर्णय हे पुरुष घेतात. महिलांना या प्रकारच्या कुटुंबाना दुय्यम स्थान असतात. जगभरात अशी पद्धती आढळून येते. भारतातील कुटुंबात पितृसत्ताक पद्धती आढळून येते. (Male dominant, female subordinate)
मातृसत्ताक कुटुंब पद्धती | Matriarchal
मातृसत्ताक कुटुंब पद्धती ही पितृसत्ताक कुटुंब पद्धतीच्या अगदी विरुद्ध असते. म्हणजेच घरातील प्रमुख व्यक्ती ही स्त्री / महिला असते. सर्व निर्णय हे कुटुंब प्रमुख म्हणून महिला घेतात. उत्तर भारतात तील काही आदिम जमाती मध्ये ही पद्धती आढळून येते. (Female dominant, male subordinate)
निवासस्थानाच्या आधारावर कुटुंबांचे दोन प्रकार | On the basis of Residence
लग्नानंतर कोण कुठे कायमस्वरूपी राहावयास जातात त्यावर कुटुंबांचे प्रकार पडतात
पॅट्रिलोकल | Patrilocal)
या प्रकारात पॅट्रिलोकलच्या विरुद्ध म्हणजेच पत्नी हि राहण्यासाठी पतीच्या घरी जाते.(Wife goes to husband’s house for live.)
मट्रिलोकल | Matrilocal
या प्रकारामध्ये पती राहण्यासाठी पत्नीच्या घरी जातो.(Husband goes to wife’s house for live)
विवाहाच्या आधारावर कुटुंबांचे चार प्रकार पडतात | On the basis of Marriage
एकपत्नी | एक विवाही कुटुंब | Monogamous
यामध्ये एक पुरुष एका स्त्रीशी लग्न करतो.( One man marry one woman)
बहुपत्नीत्व | Polygamous
या मध्ये एक पुरुष दोन किंवा अधिक स्त्रियांशी विवाह करतो. (One man marry two or more women)
बहुपतित्व | Polyandrous
यामध्ये एका स्त्रीने दोन किंवा अधिक पुरुषांशी लग्न करते. (One woman marry two or more men)
वंशाच्या आधारावर | On the basis of Ancestry
पितृवंश | Patrilineal
या मध्ये पित्याद्वारे वंश चालू ठेवले जाते. वंशावळ पित्याद्वारे बनत आलेली असते. (Ancestry continues through the father)
मातृवंश | Matrilineal
यामध्ये पितृवंशच्या उलट म्हणजेच वंश हा आईच्या माध्यमातून चालू राहतो. वंशावळ आईद्वारे बनत आलेली असते (Ancestry continues through the mother)
अंतः समूह आणि बाह्य समूहा आधार |On the basis of In-group and Out-group
एंडोगॅमस | अंतः समूह | अंतविवाही | Endogamous
जो समूह व्यक्तीला जवळचा वाटतो, ज्या समूहाबदल व्यक्ती मध्ये आपलेपणाची भावना असते त्याला अंतः समूह असे म्हणतो. यामध्ये केवळ गटातील सदस्यांमध्ये किंवा जातींतर्गतच विवाहास मंजुरी देते. ( Sanctions marriage only among members of the in-group)
बाह्य समूह | Exogamous
बाह्य समूह हे एंडोगॅमसच्या उलट मध्ये गटातील सदस्यांच्या विवाहास आउट-ग्रुपच्या म्हणजेच परीकीय समूह सदस्यांसह मंजुरी देते. (Sanctions marriage of members of an in-group with members of an out-group)
रक्ताच्या नात्याच्या आधारावर | On the basis of Blood Relationships
विवाह संबंधातून बनलेले कुटुंब | Conjugal family
पती-पत्नी, त्यांची संतती आणि विवाहाद्वारे जे नातेवाईक बनतात यांचा समावेश या प्रकारच्या कुटुंबात होतो. (Consists of spouses, their offspring and relatives through marriage)
रक्त संबंधाने तयार झालेले कुटुंब | Consanguineous family
या प्रकारच्या कुटुंबामध्ये रक्तसंबंधाने नातेवाईक जोडले जातात. जोडपे आणि मुले यांच्यासह रक्ताचे नातेसंबध असतात. (Consists of blood relatives together with their mates and children)