कुटुंब ही एक वैश्विक व मुलभूत सामाजिक संस्था | Family is universal fundamental Social institution.
माणूस सामाजिक प्राणी आहे. तो नेहमी समुहाने राहतो. तो एकटा कधीच दीर्घकाल राहू शकत नाही. मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत तो कुटुंबाचा सदस्य असतो. मानवी उत्क्रांती विविध टप्प्यावर मनुष्याला समूहाने राहण्याचे महत्व पटले तो कळपात राहून आपल्या गरजा भागवू लागला. तसेच हिस्र प्राणी व परकीय टोळीपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने कळपात राहत असे. त्यातूनच कुटुंब संस्था निर्माण झाल्या.
कुटुंबामुळे एखाद्याचा व्यक्तीचा जन्म व बालपण घडवणे, त्यांचा विकास करणे शक्य होते. संस्कृतीचे बाळकडू हे प्रथम कुटुंबात पाजले जाते. अश्या या कुटुंबसंस्थेची माहिती आपण या ब्लॉग पाहूयात.
एक वैश्विक व मुलभूत सामाजिक संस्था म्हणून कुटुंबाकडे पहिले जाते |Family is universal fundamental Social institution.
कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे हे आपल्या समजले असेल. जॉर्ज पीटर मरडॉक यांच्या म्हणण्याप्रमाणे “कुटुंब ही एक वैश्विक व मुलभूत सामाजिक संस्था आहे.” कुटुंब एक प्राथमिक व स्थिर सामजिक समूह आहे. विवाहा संबधातून कुटुंबांची निर्मिती होते व कुटुंब हे लैंगिक संबंधावर आधारित असतात. प्रजनन व संगोपन ही मुलभूत कार्ये कुटुंबाला करावी लागतात.
‘कुटुंब’ या शब्दाचा उगम | Origin word of ‘family’
“फॅम्युलस या लॅटिन शब्दापासून “कुटुंब” हा शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ हा नोकर असा होतो. (The word “Family” has been taken over form the ‘latin’ word “Famulus” means a servant.). प्राचीन रोम सारख्या समाजात घरातील पती-पत्नी, त्यांचे मुले, नोकर-चाकर या सर्वांचा समावेश हे कुटुंबात असे. सामान्य माणूस देखील आई-वडील, भाऊ, बहिण आजी-आजोबा यांना कुटुंब समजू शकते. या अर्थापेक्षा कटुंब याला समाजशास्त्रात वेगळा अर्थ अनेक सामाजाशास्त्राज्ञानी विविध व्याख्या केलेल्या आहेत. ते आता पाहूयात.
कुटुंब संस्थेची व्याख्या | Best definition of family
विवाह द्ववारे एकत्र आलेले व रक्तसंबंधांनी एकत्र आलेले स्त्री-पुरुष ज्यांचे एकत्र निवास असते. अश्या स्थिर संबंधांनी एकत्रित आलेल्या स्त्रीपुरुषांच्या गटांना कुटुंब म्हणता येईल. जिथे स्वयंपाक, सर्वप्रकारची संपती, उत्पन्न व खर्च हे सामाईक असते. अशी कुटुंबांची ढोबळ व्याख्या आपणास करता येईल.
जॉर्ज पीटर मरडॉक यांची कुटुंब संस्थेची व्याख्या
“कुटुंब हा एक सामाजिक गट आहे जो सामाईक निवास, आर्थिक सहकार्य आणि पुनरुत्पादन वैशिष्ठ्यांनी युक्त आहे.यात दोन्ही लिंगांच्या प्रौढांचा समावेश असतो, त्यापैकी किमान दोघेजण हे सामाजिक मान्यताप्राप्त लैंगिक संबंध ठेवतात आणि त्यांची एक किंवा अधिक मुले किंवा लैंगिक सहवास करणाऱ्या प्रौढांनी दत्तक घेतलेले असतात.
Definition of Family according to G. P. Murdock -“A family is a social group characterized by common residence, economic cooperation and reproduction.It includes adults of both sexes, at least two of whom maintain a socially approved sexual relationship, and one or more of their children of their own or adopted by the sexually cohabiting adults.”
इतर सामाजाशास्त्राज्ञानी केलेल्या विविध कुटुंब संस्था यांची व्याख्या
क्लरे – ” कुटूंब म्हणजे आई – वडील ( पालक ) आणि त्यांची मुले यांच्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या परस्पर संबंधाची व्यवस्था आहे. (Clare “Family is a system of relationships existing between parents and children ” )
मॅक आयव्हर व पेज -“कुटुंब हा असा समूह आहे की , जो संतती निर्माण करण्यासाठी , त्यांच्या पालनपोषणासाठी निर्माण झालेल्या लैंगिक संबंधावर आधारित असतो.”
एलियट आणि मेरिल -“कुटूंब म्हणजे पती-पत्नी आणि त्यांची मुले या सर्वांचा मिळून बनलेला एक जैविक व सामाजिक समूह होय. “Elliot and Merrill -” Family is the biological, social unit composed of husband, wife and children.”
डॉ . मुजुमदार- “कुटुंब हा अशा व्यक्तींचा समूह आहे की, ते एकाच घरात राहतात . रक्तसंबंधित असतात, परस्पर हित आणि परस्परांबद्दल कर्तव्याची जाणीव या आधारावर ‘आम्ही सर्व एक आहोत.’ ही भावना जोपासतात “
एम. एफ. निमकॉफ “अपत्य असणाऱ्या किंवा नसणाऱ्या मुलांसहित किंवा मुलांशिवाय, कमी अधिक कालावधीपर्यंत टिकून राहणारा, पती- पत्नींचा किंवा स्त्री व मुले अथवा पुरुष व मुले यांचा समूह म्हणजे कुटूंब होय.” (M. F. Nimkoff– “Family is more or less durable association of husband and wife with or without children or of a man or woman alone with children.”)
मार्शल जोन्स -“कुटुंब ही शारीरिक संबंधावर आधारलेली एक सामाजिक संस्था असून प्रजनन व संगोपन ही तिची कार्ये आहेत.”