सामाजिक संस्था म्हणजे काय | What is Social Institution?
‘संस्था’ हा शब्द ऐकल्यावर अनेकदा तांत्रिक व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक विविध संकुलांना संस्था समजण्याकडे सामान्य व्यक्तीची काल असतो. धार्मिक व सामाजिक काम करणाऱ्या क्षेत्रातील संस्था व संघटना असतात. या संस्था व संघटना समाजातील शोषित पिडीत व वंचित समुदायांच्या हक्कांसाठी कार्यरत असतात. अश्या संस्थांनाच सामाजिक संस्था म्हणतात.
काही वेळा संस्था, संघटना व मंडळे एकच समजले जाते.कारण या तिन्ही गोष्टी कोणत्या तरी हेतू, ध्येय व उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जाणूनबुजून तयार केलेल्या असतात. यांची आपल्याला वेगवेगळी उदाहरणे पुढीलप्रमाणे देता येईल.
संस्था, संघटना व मंडळे त्यांची हेतू, ध्येय व उद्दिष्ट
संस्था, संघटना व मंडळे हे विशिष्ट हेतू, ध्येय व उद्दिष्टसाठी कार्यरत असतात.
संस्था, संघटना व मंडळे | विशिष्ट हेतू, ध्येय व उद्दिष्टसाठी कार्यरत |
भारतीय तंत्रज्ञान संस्था ( IIT ) | आयआयटी ही एक शैक्षणिक संस्था आहे जी विज्ञान शाखेतून शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण संधी प्राप्त करून देते. |
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) | ISRO हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे. ही संस्था सॅटेलाईट्स आणि अंतरिक्ष तंत्रज्ञान उपलब्ध करून देते या तंत्रज्ञानाचा उपयोग भारत देशाचा विकासासाठी आणि संरक्षणासाठी केला जातो. |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) | बीसीसीआय देशातील सर्वोच्च क्रिकेट नियामक मंडळ आहे. देशात क्रिकेटच्या स्पर्धा भरविण्याचे नियम करते तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू तसेच अंपायर निवडण्याचे अधिकार आहेत. देशाच्या बाहेर अथवा देशामध्ये या मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही सामन्यांचे आयोजन करता येत नाही. |
संयुक्त राष्ट्र संघटना ( UN ) | जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना अशी ‘संयुक्त राष्ट्रां’ची (युनायटेड नेशन्स) ओळख आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. |
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ( NATO), | नाटो ही एक लष्करी संघटना आहे ज्यामध्ये 30 देशांच्या सैन्याची मदत समाविष्ट आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये रशियाच्या वाढत्या विस्ताराला पायबंद घालणं हा खरंतर नाटोचा मुख्य उद्देश होता. |
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ( RSS ) | आरएसएस ही एक उजव्या विचारसरणीची, हिंदु राष्ट्रवादी, निमलष्करी, एक स्वयंसेवी संस्था असून हि एक हिंदुत्ववादी संघटना आहे. |
जरी या तीन गोष्टी एक सारख्या वाटत असल्या तरी त्या एकसारख्या गोष्टी नाहीत. यांच्यातील मुलभूत फरक समजून घेणे खूप गरजेचे आहे.
संस्था | Institution
संस्था या मानवी गरजा भागविण्यासाठी अस्तित्वात येतात. समाजाचे सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ संस्था या स्थापन झालेल्या असतात. संस्थेमध्ये सामाजिक संबाधांची व्यवस्था असते व ते सामाजिक नियमाने व मुल्ये इत्यादींनी मिळून बनतात. उदा. कुटुंब संस्था, विवाह संस्था, अर्थ संस्था, शिक्षण संस्था व इतर
संघटना | Organization
विशिष्ट विचार, हेतू किंवा उद्देशासाठी एकत्र येऊन तयार झालेला गट म्हणजे संघटना होय.-उदा. UN, NATO, RSS.
मंडळे | Association
समान उद्दिष्टे वा गरजांकरिता व्यक्ती एकत्र येतात तेव्हा मंडळ तयार होते. आपल्या खास गरजा किंवा ध्येय पूर्ण करण्याच्या हेतूने निर्माण झालेल्या संघटनांना मंडळे असे म्हणतात. उदा. BCCI, गणेश मंडळ, महिला मंडळ इत्यादी.
सामाजिक संस्था | Social institutions in sociology
सामाजिक संस्थाच्या विविध व्याख्या या इंटर्नल लिंक जावून वाचू शकता. येथे मी काही सोपी व समजेल अशी ऑगबर्न आणि निमकॉफ यांनी केलेली सोपी व्याख्या ‘सामाजिक संस्था म्हणजे काही मूलभूत मानवी गरजा भागविण्याचे संघटित आणि प्रस्थापित असे मार्ग होत’. (‘ Social institutions are organized and established ways of satisfying certain basic human needs’. – Ogburn and Nimkoff.
सामाजिक संस्थेचे विवेचन एचई बार्न्स (1938) यांच्या मते – “सामाजिक संस्था ही यंत्रणा आहे ज्याद्वारे समाज मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांचे आयोजन, निर्देश आणि अंमलबजावणी करतो. Definition of Social Institution According to H. E. Barnes -“Social institutions are the machinery through which society organises, directs and executes the multifarious activities required to satisfy human need.”
सामाजिक संस्था यांची विविध उदाहरणे | Social institutions examples
कुटुंब संस्था ( family ), विवाह संस्था (marriage) , राज्य संस्था (Polity), अर्थ संस्था ( Economy ), धर्म संस्था (Religion ), शिक्षण संस्था ( Education) कायदा (Law), प्रसारमाध्यमे( Media ) इत्यादी.
सामाजिक संस्था या अमूर्त असतात. या मूलभूत सामाजिक गरजांभोवती विकसित होतात. यात मूलभूत सामाजिक गरजा भागविणाऱ्या विविध क्रियांचे संघटन करणाऱ्या मूल्ये, नियमने, दर्जे आणि भूमिका यातून त्या निर्माण होतात. त्यातून सुव्यवस्थित सामाजिक संबंध निर्माण होण्यास टिकण्यास मदत होते.
सामाजिक संस्थांची निर्मिती का व कशी झाली? | Why and how social institutions were formed?
जसे आपणास माहिती आहे, मनुष्याच्या काही मुलभूत गरजा आहेत. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि करमणूक इत्यादी. या गरजा एकटा व्यक्ती किंवा कुटुंब पूर्ण करू शकत नाही. अश्या विविध गरजा भागविणाऱ्या यंत्रणा कालानुरूप समाजाने तयार केल्या. त्यातून सामाजिक संस्थांची निर्मिती झाली. खालील सामाजिक संस्था व त्याद्वारे केले जाणारे कार्य यांच्या उदाहरणावरून आपण लक्षात येईल.
विवाह व कुटुंबसंस्था याद्वारे वंशसातत्य व लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाते. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व लैंगिक संबंधांच्या गरजा पूर्ण करते.
कुटुंब व नातेव्यवस्था या संस्था समाजातील व्यक्तीचे जैविक संबंध व प्रजनन यांवर नियंत्रण ठेवतात.
शैक्षणिक संस्था या संस्थांद्वारे समाजाचा सांस्कृतिक वारसा व आदर्श मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जातात. लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना ज्ञानदान करण्याचे कार्य या संस्थेद्वारे होते. व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो.
अर्थसंस्था यामध्ये अर्थकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रांशी निगडित संस्था उत्पादन, विभाजन, सेवा व वस्तुविनिमय, त्यांचा उपभोग यांबाबत दक्ष असतात. जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याचे काम या संस्थेचे आहे. समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. •
राजकीय संस्था सर्व नियमनांद्वारे समाजात शांतता, सुव्यवस्था राखून समाजविघातक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. परकीय शत्रूपासून बचाव करणे. समाज नियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते.
सामाजिक संस्थांचे प्रकार
सामान्यपणे गरजा पुरविण्यावरून सामाजिक संस्थांचे प्रकार पडतात
मानवाच्या अनेक व अनंत गरजा आहे. त्या न संपणाऱ्या अश्या आहेत. व्यक्तीपरत्वे त्या विभिन्न देखील आहेत. मानवाच्या जश्या गरजा आहेत. तश्या समाजाच्या देखील आहेत. या समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामाजिक संस्था निर्माण झालेल्या आहेत. मानवाच्या व समाजाच्या अश्या कोणत्या गरजा आहेत ज्या त्यांच्या अस्तित्वासाठी समाजाचे सातत्य, स्वास्थ्य करिता अनिवार्य आहेत. अश्या गरजांची परीपूर्ती करणाऱ्या संस्थांचे दोन प्रकार पडले आहे.
मुलभूत सामाजिक संस्था | Basic Social Institutions
ज्या संस्था मुलभूत मानवी गरजांची पूर्ती करतात. म्हणूनच समाजाच्या अस्तित्त्वासाठीच ज्या आवश्यक ठरतात. अश्या संस्था मुलभूत संस्था म्हणतात. उदा. कुटुंब संस्था , राज्य संस्था, अर्थ संस्था, धर्म संस्था.
दुय्यम सामाजिक संस्था | Secondary Social Institutions
उदा. मनोरंजन, क्रीडा संस्था. मानवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या गरजांची पूर्ती करणे तितकेसे महत्त्वाचे ठरत नाही म्हणून त्यांना दुय्यम सामाजिक संस्था असे म्हणतात.
विल्यम जॉर्ज सम्नेर (W.G. Sumner ) त्यांनी त्यांच्या फोकवेज ( Folkways) या पुस्तकात सामाजिक संस्थांचे दोन प्रकारच्या असे सांगितले आहे. त्यांनी हे प्रकार सामाजिक संस्थांची निर्मिती कशी होते यावरून पडले आहेत.
१) वर्धमान सामाजिक संस्था ( Crescive Social institution ) २) अधिनियमित (Enacted Social Institution )
वर्धमान सामाजिक संस्था Crescive Social institution
विल्यम जॉर्ज सम्नेर यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या सामाजिक संस्था स्वयंस्फुर्त रीतीने हळूहळू सामाजिक नियमाने अस्तित्वात येऊन,नंतर त्या स्थिर होऊन निर्माण होतात त्यांना वर्धमान सामाजिक संस्था असे म्हणतात. या संस्था जाणीवपूर्वक केल्या जात नाही. त्या मानवी उत्क्रांती विविध टप्प्यावर तयार होतात आणि त्या मानवाला आवश्यक व महत्वाच्या वाटू लागतात, उदा.- कुटुंब संस्था, विवाह संस्था, मालमत्ता, धर्म संस्था या वर्धमान सामाजिक संस्था आहेत.
अधिनियमित (Enacted Social Institution )
या संस्था जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येतात. त्यांना विधीस्थापित किंवा अधिनियमित सामाजिक संस्था असे म्हणतात. या संस्था विशिष्ट वेळी विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी तर्काच्या आधारावर जाणूनबुजून समाजाला तयार कराव्या लागतात. त्याला लोकांची मान्यता असते. समाजाच्या अस्तित्वासाठी, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता करिता त्या अनिवार्य असतात. उदा.- कायदा, शिक्षणसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था न्यायालये इत्यादी.
सामाजिक संस्थेची वैशिष्ठ्ये | Characteristics of Social Institutions
1.संस्था या हेतूपूर्ण स्थापन झालेल्या असतात. | Institutions are purposive.
2.सामग्रीमध्ये तुलनेने कायमस्वरूपी | Relatively permanent in content
3.संस्था रचना | Institutions are structured
4.संस्था एक एकीकृत रचना आहे | Institutions are a unified structure.
5.अनियोजित विकास | Unplanned development
6.अनौपचारिक निर्मिती | Informal formation
7.चिन्हे | Symbols
8.आचारसंहिता | Code of behavior
9. संस्थात्मक यंत्रणा व संस्था | Organizational agencies and institutions.
10. सामाजिक संस्था परस्परसंबंधित आणि परस्परावलंबित आहेत | Social institutions are interrelated and interdependent.
11. प्रत्येक समाजातील सामाजिक संस्थेचे स्वरूप इतर समाजापेक्षा भिन्न असते | Nature of Social institution varies from society to society