ABHA हेल्थ आयडी | ABHA-Ayushman Bharat Health Account
जाणून घ्या डिजिटल हेल्थ आयडी फायदे आणि तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती ठेवा डिजिटल स्वरुपात.
आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना हेल्थ आयडी दिले जाते. नुकतेच सरकारकडून डिजिटल हेल्थ आयडीला ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ ABHA (Ayushman Bharat Health Account) असे नामकरण करण्यात आले आहे.
या हेल्थ कार्डद्वारे नागरिकांचे आरोग्य रेकॉर्ड सुरक्षितपणे संग्रहित केले जाते. सर्व वयोगटातील महिला, पुरुष मुले यासाठी पात्र असणारे आहे.
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नोंदणी करिता आवश्यक माहिती व दस्तावेज
- नाव, First Name
- जन्म दिनांक, DATE OF BIRTH
- लिंग, Gender
- पीएचआर PHR Address (Personal Health Records)
- Password/ पासवर्ड
- पत्ता, Address
- State/UT/ राज्य
- District / जिल्हा
- आधार कार्ड
- आधारशी लिंक असणारा मोबाइल नंबर
डिजिटल हेल्थ आयडी किंवा ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट’ हे आधार कार्डशी जोडल्यामुळे आधारवरील माहिती फोटोसह हे हेल्थ अकाउंट किंवा आयडी भरताना अपोआप फॉर्म मध्ये भरलेला येतो. त्यासाठी फक्त एकच महत्वाची गोष्ट तुमचा मोबाईल नं हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे.
जर मोबाईल नं जर लिंक नसेल तरही तुम्ही हे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट शकता. त्यासाठी I don’t have any IDs / I don’t want to use my IDs for creating ABHA >> Click here यावर क्लिक करून तुमच्याकडे असणारा मोबाईल नं टाकून OTP टाकून बासिक माहिती, टाकून आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट काढू शकता. मोबाईल नं लिंक असल्यास फक्त 3 मिनिटामध्ये तुम्ही तुमचे कार्ड बनवू शकता. लिंक नसेल तर 5-10 मिनिटात तुम्ही काढू शकता नंतर तुम्ही त्यात बदल ही करू शकता. KYC करू शकता. आणि आधारशी ही जोडू शकता.
हेल्थ आयडी कार्डचे फायदे
- नागरिकांच्या संमतीने डॉक्टरांना या डेटाबेसमध्ये प्रवेश करता येईल. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती जसे की सल्लामसलत, अहवाल इत्यादी डेटाबेसमध्ये डिजिटल स्वरूपात संग्रहित केले जातील.
- नागरिकांना त्यांचे वैद्यकीय रेकॉर्ड हार्ड कॉपीच्या स्वरुपात ठेवण्याची आवश्यकता नाही.
- सर्व रुग्णालये आणि डॉक्टरांची माहिती या हेल्थ अकाऊंटमध्ये संग्रहित केली जाते.
- तुम्ही घरी बसून कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
- जर तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर हेल्थ कार्ड अनिवार्य राहील.
तुम्ही व तुमचे कुटुंब हे आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी आहात की नाही हे जाऊन घ्या पुढील लिंक द्वारे.
आयुष्मान भारत योजनेबद्दल माहिती मराठी मध्ये. https://youtu.be/fXhxOZED-Ks
हेल्थ आयडी | आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट करिता अर्ज प्रक्रिया
- राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची अधिकृत वेबसाइट https://healthid.ndhm.gov.in/ असेल.
- तुम्हाला Generate ABHA च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- Create your ABHA now या लिंकवर क्लिक करा.
- जर तुम्हाला आधार कार्डद्वारे हेल्थ आयडी जनरेट करायचा असेल तर तुम्हाला आधार कार्डद्वारे जनरेट करा या लिंकवर क्लिक करावे लागेल आणि जर तुम्हाला मोबाइल नंबरद्वारे हेल्थ आयडी जनरेट करायचा असेल तर तुम्हाला मोबाईलद्वारे जनरेट करा या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- जर तुम्ही आधार कार्ड निवडले असेल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक भरावा लागेल आणि जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर निवडला असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल.
- आता तुमच्या फोनवर OTP येईल. हा OTP तुम्हाला OTP बॉक्समध्ये भरावा लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- आता तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा हेल्थ आयडी तयार होईल.
संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पाहण्याकरिता पुढील लिंक वर जाऊन व्हिडीओ पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=UHkNIYoj3_g