मधुमेह म्हणजे काय | What is diabetes in Marathi
मधुमेह हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर होते. म्हणजे साखर जास्त खाल्ल्यावर किंवा गोड जास्त खाल्ल्यावर मधुमेह होतो का? असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येईल. आणखीन एक प्रश्न पडेल की, आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण किती आहे हे कसे ओळखायचे? त्यासाठी कोणते साधन वापरावे लागते हे प्रश्न आपल्याला नक्कीच पडले असणार. या सर्व प्रश्नाची उत्तरे आपणस या पोस्ट मध्ये मिळाले.
मधुमेह (डायबेटिस) म्हणजे काय?
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून होणारा रोग होय. जग भर हा आजार वेगाने बकालत चालले आहेत. मधुमेहावर कोणताही इलाज नसला तरी तो जीवनशैली आणि आहारातील बदल किंवा इन्सुलिनसारख्या औषधांनी नियंत्रित केला जाऊ शकतो.
आपल्या शरीरातील इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. जेव्हा रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा पोहोचवण्याच्या कामात अडथला येतो.
मधुमेहाचे दोन प्रकार आहेत.
टाइप 1 मधुमेह
हे सामान्यतः लहान मुले, किशोरवयीन आणि तरुण प्रौढांमध्ये निदान केले जाते. टाइप 1 मधुमेहासाठी फारसे जोखीम नसते. हे अनुवांशिक असते.
टाइप 1 मधुमेहाच्या निदानासाठी जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. जगण्यासाठी तुम्हाला दररोज इन्सुलिन घेणे आवश्यक आहे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार निरीक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे आणि काळजीपूर्वक आहार घेणे गरजेचे असते. मर्यादित प्रमाण शरीरात कर्बोदके घेणे गरजेचे असते. मोजणे आवश्यक आहे.
टाइप 2 मधुमेह
प्रकार 2 मधुमेह हे बहुतेकदा प्रौढांमध्ये निदान केले जाते,
टाइप २ सह, तुमचे शरीर इन्सुलिन तयार करू शकते, परंतु ते त्याचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, जे जेव्हा तुमचे यकृत, स्नायू आणि चरबीच्या पेशी तुमच्या रक्तातील साखरेचा ऊर्जेसाठी वापर करण्यासाठी प्रभावीपणे घेत नाहीत तेव्हा होते. परिणामी, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे शेवटी टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.
टाइप 2 मधुमेहाचा धोका पुढील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.
- 40-45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत
- जास्त वजन किंवा लठ्ठ आहेत
- व्यायामचा अभाव
- कुटुंबातील सदस्यास टाइप २ मधुमेह असणे.
निरोगी आहार घेण्याव्यतिरिक्त, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी निरोगी वजन राखणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत होऊ शकते.
मधुमेह किंवा रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यावर आढळून येणारी लक्षणे
- सतत तहान लागणे.
- सतत लघवीला जावे लागणे,
- रात्री दोन किंवा तीन पेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागणे.
- शरीरावर एखादी जखम झाल्यास ती लवकर बरी न होणे
- जखम भरून येण्यास वेळ लागणे
- लिंगावर बुरशी सारखे काही तरी इन्फेक्शन होणे
- लिंगाच्या फोरहेडवरील त्वचा याला चिरा पडणे.( शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यावर सुरुवातीला हे लक्षण येते )
- थकवा अशक्तपणा जाणवणे
- लघवीच्या ठिकाणी खाज सुटणे
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- हातापायात मुंग्या आणि बधिरपणा येणे.
रक्तातील साखर वाढल्याचे सांगणारे नैसर्गिक इंडिकेटर कोणते?
जेव्हा तुम्ही वारंवार लघवीला जात असाल आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हीच लाघवी करीत आणि तेथे आपण काळ्या मुंग्या जर तुम्ही लाघवी केलेल्या ठिकाणी आढळून आल्या असतील तर समजून जावे की तुमच्यामध्ये साखरेचे प्रमाण वाढले आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी टेस्ट केल्यावर HBA1 C हिमोग्लोबिन व ग्लुकोज आयडाल प्रमाण
- HBA1 C : 7% पेक्षा कमी
- जेवणाच्या आधी: 100 mg/dl पेक्षा कमी
- जेवणानंतर दोन तासांनी : 140 ते 160 mg/dl दरम्यान असायला हवे.
जाणून घ्या इन्सुलिन कार्य
इन्सुलिन हा एक प्रकारचा संप्रेरक आहे, जो शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतो आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतो. पण आपल्यापैकी बहुतेकांना मधुमेहासारख्या धोकादायक आजारामुळे इन्सुलिनबद्दल माहिती आहे. कारण शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रकारे होत नसेल किंवा ते त्याचे काम नीट करू शकत नसेल तर आपण साखरेचे रुग्ण होऊ शकतो.
इन्सुलिन शरीरात अनेक गोष्टी करते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच इन्सुलिन शरीरातील चरबी वाचवण्याचे काम करते. जेणेकरून शरीराला गरज असेल तेव्हा या चरबीचा वापर करता येईल.
रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच इन्सुलिन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचे काम करते. म्हणजेच ग्लुकोज प्रत्येक पेशीपर्यंत मर्यादित प्रमाणात पोहोचते.
आपले शरीर सक्रिय ठेवण्यासाठी, इन्सुलिनचे उत्पादन आणि त्याचे शोषण या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रक्रियेत काही अडचण आल्यास, व्यक्ती थकल्यासारखे आणि असहाय्य वाटते.
इन्सुलिन चयापचय प्रक्रिया योग्य ठेवण्यास मदत करते. इन्सुलिन स्वादुपिंडात तयार होते आणि कार्यक्षमतेनुसार ते अनेक प्रकारचे असते.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यावर कोणते आहार घेऊ नये.
- साखरे पासून बनलेले सर्व पदार्थ बंद करून टाकावे.
- बटाटे व बटाटेपासून तयार केलेले सर्व पदार्थ खाऊ नये.
- वांगी खाऊ नये.
- तेलकट तुपकट साय लोणी काढणे शेंगदाणा साबुदाणा खाऊ नये.
- मैदाचे पदार्थ टाळावे
- बीट, रताळ बटाटा करू नये
- फळांमध्ये केळी, चिकू सीताफळ, द्राक्षे आंबा इत्यादी खाऊ नये.
रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यावर कोणता आहार घ्याल.
- दुध, दही, ताक आणि पनीर खाऊ शकता.
- सर्व प्रकारच्या हिरव्या पाले भाज्या खाऊ शकता. ( पालक, कोबी, फ्लावर, )
- आठवड्यातून एकदा मासे व चिकन खाऊ शकता.
- नाष्टा यामध्ये पोहे, उपमा किंवा उपीट खावू शकता आणि अंड्याचा फक्त पांढरा भाग तुम्ही खावू शकता.
- सर्व प्रकारचे कडधन्ये खाऊ शकता.
साखरेवर आणि मधुमेहावर नियंत्रण कसे आणला.
वेळोवेळी रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करावे. त्यानुसार वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन गोळ्या घेत जावे. वर सांगितल्याप्रमाणे आहार किंवा आपल्या डॉक्टर ने सांगितल्याप्रमाणे डायेट तयार करून घ्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे दररोज व्यायाम करणे. 45 मिनिटे अथवा 1 तास भरभर चालणे या गोष्टी करून तुम्ही साखरेवर आणि मधुमेहावर नियंत्रण अणु शकाल.