शाश्वत विकास ध्येये म्हणजे काय मराठी मध्ये | What is sustainable developments in Marathi
शाश्वत विकासाची ध्येये | Sustainable Development Goals
शाश्वत विकास ध्येये ( SDG ) खालील प्रमाणे असून ती सन 2030 पर्यंत साध्य करावयाची आहेत.
शाश्वत विकास ध्येये SDGs Goal-1
सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे . ( No Poverty ).
शाश्वत विकास ध्येये SDGs Goal-2
भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. ( Zero Hunger )
SDGs Goal-3
आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. ( Good Health & Well – being ).
SDGs Goal-4
सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे. ( Quality Education )
SDGs Goal-5
लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे. ( Gender Equality )
SDGs Goal-6 शाश्वत विकास ध्येये
पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सनिश्चित करणे. ( Clean Water & Sanitation )
SDGs Goal-7
सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह , शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे. ( Affordable & Clean Energy )
SDGs Goal-8 शाश्वत विकास ध्येये
शाश्वत , सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे. ( Decent Work & Economic Growth )
SDGs Goal-9
पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे. ( Industry , Innovation & Infrastructure )
SDGs Goal-10
देशांमधील विविध असमानता दूर करणे. ( Reduced Inequality )
SDGs Goal-11 शाश्वत विकास ध्येये
शहरे आणि मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे. ( Sustainable Cities & Communities )
शाश्वत विकास ध्येये SDGs Goal-12
उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे. ( Responsible Consumption & Production )
SDGs Goal-13 शाश्वत विकास ध्येये
हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी उपाययोजना करणे. ( Climate Action )
SDGs Goal-14
महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे . ( Life Below Water )
SDGs Goal-15 शाश्वत विकास ध्येये
परिस्थितिकीय व्यवस्थांचा ( Ecosystem ) शाश्वत पद्धतीने वापर करणे . वनाचे शाश्वत व्यवस्थापन , वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे , जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे . ( Life On Land )
SDGs Goal-16
शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वांची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे. ( Peace, Justice & Strong Institutions )
SDGs Goal-17
चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. ( Partnerships for the Goals )
शाश्वत विकास ध्येये यांचे टार्गेट | Goal targets in Marathi and English
SDG Goal-1 | सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे पहिल्या ध्येय करिता ठेवलेली 5 लक्ष्य उद्दिष्टे ( 1.1 ते 1.5 b ) | End poverty in all its forms everywhere Set targets under 1st Goal of SDG- 5 (1.1 to 1.5 b) |
1.1 | सन 2030 पर्यंत, सगळीकडे असणाऱ्या लोकांमधील आत्यंतिक दारिद्रय दूर करणे. दररोज 1.25 डॉलरहून कमी पैशामध्ये उदरनिर्वाह करणारे सर्व लोकांना गरीब म्हणून अलीकडेच गणना केलेली आहे, डॉलर:रुपया दर सन 2015 ($ 1.25 -₹- 81.25), आता सन 2022 ($ 1.25 -₹- 94.25 .) . | By 2030, eradicate extreme poverty for all people everywhere, currently measured as people living on less than $1.25 a day |
1.2 | सन 2030 पर्यंत, राष्ट्रीय व्याख्यानुसार, दारिद्रयात राहणाऱ्या सर्व वयोगटांतील पुरुष, स्त्रिया व बालके यांचे दारिद्रयाचे प्रमाण किमान निम्म्यावर आणणे. | By 2030, reduce at least by half the proportion of men, women and children of all ages living in poverty in all its dimensions according to national definitions |
1.3 | तळागाळात राहणाऱ्या लोकांसह, सर्व स्तरांतील लोकांसाठी राष्ट्रीय दृष्टया योग्य सामाजिक संरक्षण प्रणाली व उपाययोजना राबविणे आणि 2030 पर्यंत गरीब व दुर्बल घटकांतील लोकांपर्यंत त्या व्यापक प्रमाणात पोहोचवण्याचे उद्दिष्ट गाठणे. | Implement nationally appropriate social protection systems and measures for all, including floors, and by 2030 achieve substantial coverage of the poor and the vulnerable |
1.4 | सन 2030 पर्यंत, सर्व पुरुष व महिलांना, विशेषत: गरीब आणि दुर्बल घटकांतील पुरुष व महिलांना समान हक्क असेल त्याबाबत सुनिश्चिती करणे. हे समान हक्क त्यांना आर्थिक संसाधनमध्ये, त्याचप्रमाणे मूलभूत सेवा प्रदान करण्यात, जमिनी सारख्या आणि इतर स्वरूपातील मालमत्ता यावर नियंत्रणासह मालकी हक्कामध्ये, वारसाप्राप्त संपत्तीमध्ये, नैसर्गिक साधनसंपत्ती, योग्य नवीन तंत्रज्ञान आणि सूक्ष्म वित्त पुरवठयासह वित्तीय सेवा इत्यादी मिळण्याचा समान हक्क असेल याची सुनिश्चिती करणे . | By 2030, ensure that all men and women, in particular the poor and the vulnerable, have equal rights to economic resources, as well as access to basic services, ownership and control over land and other forms of property, inheritance, natural resources, appropriate new technology and financial services, including microfinance |
1.5 | सन 2030 पर्यंत, गरीब व अत्यंत दुर्बल स्थितीत राहणाऱ्या लोकाना आत्मनिर्भर करणे आणि वातावरणाशी संबंधित असलेल्या गंभीर घटनांमुळे आणि इतर आर्थिक, सामाजिक, आणि पर्यावरणविषयक आघातामुळे किंवा आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना त्यातून बाहेर व त्याची दुर्बलता कमी करणे. | By 2030, build the resilience of the poor and those in vulnerable situations and reduce their exposure and vulnerability to climate-related extreme events and other economic, social and environmental shocks and disasters |
1.5.1a | सर्व स्तरावरील गरिबी नष्ट करण्यासाठी कार्यक्रम व धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी, विकसनशील देश, विशेषता अल्प विकसित देश यांच्याकरिता पर्याप्त व संभाव्य साधने पुरविण्याच्या दृष्टीने वाढीव विकासात्मक सहकार्यामधून, विविध स्रोतांमधून, महत्वपूर्ण साधनसंपत्ती उभारण्याची सुनिश्चिती करणे. | Ensure significant mobilization of resources from a variety of sources, including through enhanced development cooperation, in order to provide adequate and predictable means for developing countries, in particular least developed countries, to implement programmes and policies to end poverty in all its dimensions |
1.5.1b | दारिद्रय निर्मूलनाच्या कार्यामध्ये वर्धित गुंतवणूकीसाठी सहाय्यभूत होण्यासाठी, गरीबाभिमुख आणि लिंग संवेदनशील विकास रणनीती आधारित राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरांवर एक निकोप धोरणात्मक आराखडा तयार करणे . | Create sound policy frameworks at the national, regional and international levels, based on pro-poor and gender-sensitive development strategies, to support accelerated investment in poverty eradication actions |
SDG Goal-2 | भूक संपवणे , अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. दुसऱ्या ध्येय करिता ठेवलेली 5 लक्ष्य उद्दिष्टे 5 (2.1 to 2.5- 2.a to 2.c) | End hunger, achieve food security and improved nutrition and promote sustainable agriculture Set targets under 2nd Goal of SDG- 5 (2.1 to 2.5- 2.a to 2.c) |
2.1 | सन 2030 पर्यंत, उपासमारी नष्ट करणे, तसेच अर्भकांसह सर्व वयोगटातील सर्व लोकांना विशेषत: गरीब आणि अत्यंत दुर्बल स्थितीत राहणाऱ्या इतर सर्व लोकांना वर्षभर सुरक्षित, पोषक व पुरेसे अन्न मिळण्याची सुनिश्चिती करणे. | By 2030, end hunger and ensure access by all people, in particular the poor and people in vulnerable situations, including infants, to safe, nutritious and sufficient food all year round. |
2.2 | सन 2030 पर्यंत, सर्व प्रकारचे कुपोषण नष्ट करणे, त्याचबरोबर 2025 पर्यंत 5 वर्षाखालील, वाढ खुंटलेल्या व अशक्त बालकांबाबतची आंतरराष्ट्रीय स्तरावर संमत केलेली लक्ष्ये साध्य करणे आणि पौगंडावस्थेतील मुली, गर्भवती महिला व स्तन्यदा माता व वयोवृध्द व्यक्ती यांच्या पोषण आहार विषयक गरजांची पूर्तता करणे. | By 2030, end all forms of malnutrition, including achieving, by 2025, the internationally agreed targets on stunting and wasting in children under 5 years of age, and address the nutritional needs of adolescent girls, pregnant and lactating women and older persons |
2.3 | सन 2030 पर्यंत, कृषि उत्पादकतेत आणि अन्नधान्याचे अल्प उत्पादकांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ करणे. ही वाढ करताना विशेषत: महिला, मूळ रहिवासी शेतकरी कुटुंब, पशुपालक व मच्छीमार यांना जमीन, इतर उत्पादक साधनसंपत्ती व कच्चा माल, ज्ञान, वित्तीय सेवा, बाजारपेठा आणि मूल्यवर्धनाच्या व शेतीवर आधारित रोजगाराच्या संधी खात्रीशीर आणि समानतेने उपलब्ध करून देऊन त्याद्वारे यांच्या कृषि उत्पादकतेत आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ करणे. | By 2030, double the agricultural productivity and incomes of small-scale food producers, in particular women, indigenous peoples, family farmers, pastoralists and fishers, including through secure and equal access to land, other productive resources and inputs, knowledge, financial services, markets and opportunities for value addition and non-farm employment |
2.4 | सन 2030 पर्यंत, शाश्वत अश्या अन्न उत्पादन पध्दतींची आणि ज्या उत्पादकता व उत्पादन वाढवतील अश्या लवचिक कृषि विषय प्रथांची अंमलबजावणी करणे. जेणेकरून पर्यावरण व्यवस्था राखण्यात मदत करतील आणि हवामान बदल, प्रतिकूल हवामान, अवर्षण, पूर व इतर आपत्ती यांमध्ये जूळवून घेण्याची क्षमता वाढवतील आणि जमीन व मातीचा दर्जा अधिकाधिक सुधारतील. | By 2030, ensure sustainable food production systems and implement resilient agricultural practices that increase productivity and production, that help maintain ecosystems, that strengthen capacity for adaptation to climate change, extreme weather, drought, flooding and other disasters and that progressively improve land and soil quality |
2.5 | सन 2020 पर्यंत, बियाणे व रोप पेढ्या यांच्या माध्यमातून बियाणे म्हणून लागवड केलेली झाडे आणि शेतकामाचे व पाळीव प्राणी व तत्संबंधित वन्य प्रजाती यांची जणुकीय विविधता टिकवणे, यामध्ये राष्ट्रीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील सुयोग्य व्यवस्थापन केलेले आणि विविधता असलेली बियाणे आणि लागवड केलेली झाडे यांचाही समावेश आहे तसेच आंतराष्ट्रीय दृष्ट्या मान्य केल्यानुसार, जनुकीय संपत्तीच्या आणि संबंधित पारंपरिक ज्ञानाच्या वापरातून मिळालेल्या लाभाची निष्पक्ष आणि समन्यायपणे विभागणी होण्याची सुनिश्चिती करणे. | By 2020, maintain the genetic diversity of seeds, cultivated plants and farmed and domesticated animals and their related wild species, including through soundly managed and diversified seed and plant banks at the national, regional and international levels, and promote access to and fair and equitable sharing of benefits arising from the utilization of genetic resources and associated traditional knowledge, as internationally agreed |
2.5 2.a | विकसनशील देशांमध्ये, विशेषत: अल्प विकसित देशांमध्ये कृषि उत्पादक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने, ग्रामीण पायाभूत सुविधा, कृषि संशोधन व विस्तार सेवा, तंत्रज्ञान विकास आणि रोप व पशुधन जनुक पेढ्या या क्षेत्रांमध्ये वाढीव आंतरराष्ट्रीय सहकाराच्या माध्यमातून गुंतवणूक वाढविणे . | Increase investment, including through enhanced international cooperation, in rural infrastructure, agricultural research and extension services, technology development and plant and livestock gene banks in order to enhance agricultural productive capacity in developing countries, in particular least developed countries |
2.52.b | दोहा विकास चर्चाफेरीच्या जाहिरनाम्यानुसरून सम-न्याय प्रभावांसह कृषि निर्यातीवरील सर्व प्रकारची अर्थसहाय्ये आणि निर्यात उपाययोजना यांचे एकाचवेळी समांतरपणे उच्चाटन करून त्याद्वारे जागतिक कृषी बाजापेठांमधील व्यापारविषयक निर्बंध व त्रुटी दुरूस्त करणे व त्यांना प्रतिबंध करणे . | Correct and prevent trade restrictions and distortions in world agricultural markets, including through the parallel elimination of all forms of agricultural export subsidies and all export measures with equivalent effect, in accordance with the mandate of the Doha Development Round |
2.52.c | अन्न कमोडिटी मार्केट आणि त्यांच्या डेरिव्हेटिव्ह्जचे योग्य कार्य सुनिश्चित करण्यासाठी उपायांचा अवलंब करा आणि अन्नसाठ्यांसह बाजारातील माहितीवर वेळेवर प्रवेश सुलभ करा, ज्यामुळे अन्नाच्या किमतीतील अस्थिरता मर्यादित करण्यात मदत होईल. | Adopt measures to ensure the proper functioning of food commodity markets and their derivatives and facilitate timely access to market information, including on food reserves, in order to help limit extreme food price volatility |
SDG Goal-3 | आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. तिसऱ्या ध्येया करिता ठेवलेली 5 लक्ष्य उद्दिष्टे 9 (3.1 to 3.9- 3.a to 2.d) | Ensure healthy lives and promote well-being for all at all ages Set targets under 2nd Goal of SDG 9 (3.1 to 3.9- 3.a to 2.d) |
3.1 | सन 2030 पर्यंत, जागतिक माता मृत्यू दराचे प्रमाण प्रत्येकी 100,000 जन्मदरामागे 70 इतके कमी करणे. | By 2030, reduce the global maternal mortality ratio to less than 70 per 100,000 live births |
3.2 | सन 2030 पर्यंत नवजात शिशु आणि 5 वर्षांच्या आतील बालक यांचे प्रतिबंधयोग्य मृत्यू थांबविणे .सर्व देशांनी नवजात मृत्यू दर 1,000 जिवंत जन्मांमागे किमान 12 आणि 5 वर्षाखालील मृत्यू दर 1,000 जिवंत जन्मांमागे 25 पर्यंत पेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. | By 2030, end preventable deaths of newborns and children under 5 years of age, with all countries aiming to reduce neonatal mortality to at least as low as 12 per 1,000 live births and under-5 mortality to at least as low as 25 per 1,000 live births |
3.3 | सन 2030 पर्यंत, एड्स, क्षयरोग, हिवताप, आणि दुर्लक्षित उष्ण प्रदेशात होणारे रोग नष्ट करणे आणि कावीळ, पाण्यापासून होणारे रोग व इतर संक्रमणशील रोग यांचा मुकाबला करणे. | By 2030, end the epidemics of AIDS, tuberculosis, malaria and neglected tropical diseases and combat hepatitis, water-borne diseases and other communicable diseases |
3.4 | सन 2030 पर्यंत, प्रतिबंध व उपचार आणि मानसिक आरोग्य व स्वास्थ यांचे प्रचालन करून असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशापर्यंत कमी करणे. | By 2030, reduce by one third premature mortality from non-communicable diseases through prevention and treatment and promote mental health and well-being |
3.5 | अंमली औषधी द्रव्यांचा दुरूपयोग करणे आणि अल्कोहोलचा घातक वापर यासह अशा पदार्थांना प्रतिबंध करण्याच्या व उपचार करण्याच्या उपाययोजना अधिक मजबूत करणे. | Strengthen the prevention and treatment of substance abuse, including narcotic drug abuse and harmful use of alcohol. |
3.6 | सन 2020 पर्यंत, रस्ते दुर्घटनांमध्ये होणारे अपघातांमुळे होणाऱ्या दुखापती आणि मृत्यू यांचे जागतिक प्रमाण निम्म्याने कमी करणे. | By 2020, halve the number of global deaths and injuries from road traffic accidents |
3.7 | सन 2020 पर्यंत, कुटुंब नियोजन, माहिती व शिक्षण यांसह लैंगिक व पुनरोत्पादन सम आरोग्य सुश्रुषा सेवा सार्वत्रिकपणे मिळण्याची सुनिश्चिती करणे आणि पुर्नउत्पादक आरोग्याचे राष्ट्रीय ध्येयधोरण व कार्यक्रम यांच्याशी एकात्मिकरण करणे. | By 2030, ensure universal access to sexual and reproductive health-care services, including for family planning, information and education, and the integration of reproductive health into national strategies and programmes |
3.8 | वित्तीय जोखीम संरक्षणासह सार्वत्रिक आरोग्य संगोपन सेवेस आवश्यक सुरक्षा साध्य करणे, दर्जेदार अत्यावश्यक आरोग्य सुश्रुषा सेवा मिळणे, आणि सर्वांसाठी सुरक्षित, प्रभावी, गुणवत्तापूर्ण व परवडण्याजोगी अत्यावश्यक औषधे व लसी मिळणे. | Achieve universal health coverage, including financial risk protection, access to quality essential health-care services and access to safe, effective, quality and affordable essential medicines and vaccines for all |
3.9 | सन 2030 पर्यंत, घातक रसायने आणि हवा, जल आणि मृद प्रदूषण व प्रदूषके यापासून मोठ्या संख्येने होणारे मृत्यू व आजार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करणे. | By 2030, substantially reduce the number of deaths and illnesses from hazardous chemicals and air, water and soil pollution and contamination |
3.9 3.a | तंबाखु नियंत्रणाबाबतच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनची सर्व देशांमध्ये योग्य असेल त्याप्रमाणे धोरणात्मक कराराची अधिक सक्षमपणे अंमलबजावणी करणे. | Strengthen the implementation of the World Health Organization Framework Convention on Tobacco Control in all countries, as appropriate |
3.9 3. b | प्रामुख्याने, विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवरील लसी व औषधे यांचे संशोधन व विकास करण्यासाठी सहाय्य करणे . ज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षण करण्यासाठीच्या लवचिकतेच्या संबंधात बौध्दिक मालमत्ता हक्काच्या व्यापाराशी संबंधित असलेल्या पैलूंच्या संबंधातील करारातील संपूर्ण तरतुदींचा वापर करण्याच्या विकसनशील देशांच्या हक्कास मान्यता दिलेली आहे अशा ट्रिप्स करारानुसार आणि सार्वजनिक आरोग्य या संबंधात दोहा घोषणापत्रानुसार परवडण्याजोगी अत्यावश्यक औषधे व लसी पुरविणे आणि विशेषता सर्वांसाठी औषधे पुरविणे. | Support the research and development of vaccines and medicines for the communicable and non-communicable diseases that primarily affect developing countries, provide access to affordable essential medicines and vaccines, in accordance with the Doha Declaration on the TRIPS Agreement and Public Health, which affirms the right of developing countries to use to the full the provisions in the Agreement on Trade-Related Aspects of Intellectual Property Rights regarding flexibilities to protect public health, and, in particular, provide access to medicines for all |
3.9 3.c | विकसनशील देशामध्ये विशेषता कमीतकमी विकसित देशांमध्ये आणि छोटे द्विपकल्प असलेल्या विकसनशील राज्यामध्ये, आरोग्या संबंधीच्या वित्त पुरवठयात भरीव वाढ करणे व तसेच आरोग्य विषयक मनुष्य बळाची नोकर भरती करणे, त्यांचा विकास करणे व त्यांचे प्रशिक्षण करणे आणि त्यांना टिकवून ठेवणे. | Substantially increase health financing and the recruitment, development, training and retention of the health workforce in developing countries, especially in least developed countries and small island developing States |
3.9 3.d | धोक्याची पूर्व सूचना देणे, जोखीम कमी करणे आणि राष्ट्रीय व जागतिक आरोग्य जोखीम व्यवस्थापन करणे यासाठी सर्व देशांची विशेषत: विकसनशील देशांची क्षमता वाढविणे. | Strengthen the capacity of all countries, in particular developing countries, for early warning, risk reduction and management of national and global health risks |
SDG Goal-4 | सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समन्याय्य असे गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करणे आणि आजीवन शिकण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे. चौथ्या ध्येया करिता ठेवलेली लक्ष्य उद्दिष्टे 7 (4.1 to 4.7- 4.a to 4.c) | Ensure inclusive and equitable quality education and promote lifelong learning opportunities for all Set targets under 4th Goal of SDG 7 (4.1 to 4.7- 4.a to 4.c) |
‘4.1 | सन 2030 पर्यंत, सर्व मुली आणि मुले यांना विनामूल्य, समान आणि दर्जेदार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात याची खात्री करणे ज्यामुळे संबंधित आणि प्रभावी शिक्षणाच्या फलनिष्पत्ती मिळतील. | By 2030, ensure that all girls and boys complete free, equitable and quality primary and secondary education leading to relevant and effective learning outcomes |
4.2 | सन 2030 पर्यंत, सर्व मुली व मुले प्राथमिक शिक्षणासाठी तयार व्हावे म्हणून त्यांना दर्जेदार, पूर्व बाल्यावस्था विकास, काळजी व प्राथमिक शिक्षण मिळत असल्याची सुनिश्चिती करणे. | By 2030, ensure that all girls and boys have access to quality early childhood development, care and pre-primary education so that they are ready for primary education |
4.3 | सन 2030 पर्यंत, सर्व महिला व पुरुषांना परवडणारे आणि दर्जेदार असे तांत्रिक , व्यावसायिक, आणि विद्यापीठातील शिक्षण समानतेने मिळत असल्याची सुनिश्चिती करणे. | By 2030, ensure equal access for all women and men to affordable and quality technical, vocational and tertiary education, including university |
4.4 | सन 2030 पर्यंत, ज्यांच्याकडे रोजगार, उत्तम नोकरी आणि उद्योजकतेसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यांसह संबंधित कौशल्ये असलेल्या तरुण आणि प्रौढांच्या संख्येत लक्षणीय वाढ करणे. | By 2030, substantially increase the number of youth and adults who have relevant skills, including technical and vocational skills, for employment, decent jobs and entrepreneurship |
4.5 | सन 2030 पर्यंत, शिक्षणातील लिंगभावातील असमानता दूर करणे आणि आणि विकलांग व्यक्ती, स्थानिक लोक, दुर्बलस्थितीतील बालके यांसह दुर्बल घटकांसाठी शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या सर्व स्तरावर समान शिक्षण मिळत असल्याची सुनिश्चिती करणे. | By 2030, eliminate gender disparities in education and ensure equal access to all levels of education and vocational training for the vulnerable, including persons with disabilities, indigenous peoples and children in vulnerable situations |
4.6 | सन 2030 पर्यंत, असे सर्व युवकांनी तसेच आणि पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही मोठ्या प्रमाणातील प्रौढ व्यक्तींनी साक्षरता व संख्यांकन क्षमता साध्य केल्याची सुनिश्चिती करणे. | By 2030, ensure that all youth and a substantial proportion of adults, both men and women, achieve literacy and numeracy |
4.7 | सन 2030 पर्यंत, शाश्वत विकासास चालना देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये सर्व नवशिक्षितांनी संपादन केल्याची सुनिश्चिती करणे.तसेच शिक्षणाद्वारे शाश्वत विकास व शाश्वत जीवनमान, मानवी हक्क, लिंगभाव समानता, शांतता आणि अहिंसेच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच, , सार्वत्रिक नागरिकत्वाचा हक्क आणि सांस्कृतिक विविधतेचे आकलन आणि शाश्वत विकासासाठी सांस्कृतिक योगदान घेणे | By 2030, ensure that all learners acquire the knowledge and skills needed to promote sustainable development, including, among others, through education for sustainable development and sustainable lifestyles, human rights, gender equality, promotion of a culture of peace and non-violence, global citizenship and appreciation of cultural diversity and of culture’s contribution to sustainable development |
4.7 4.a | बालक, विकलांग आणि लिंगभावसंवेदनशील अश्या दुर्बलांना घटकांना शैक्षणिक सोयी सुविधा बळकट व अद्ययावत करणे आणि सर्वांसाठी सुरक्षित, अहिंसक, सर्व समावेशक व प्रभावी अध्ययन वातावरण पुरविणे. | Build and upgrade education facilities that are child, disability and gender sensitive and provide safe, non-violent, inclusive and effective learning environments for all |
4.7 4.b | सन 2020 पर्यंत, विकसित देशामधील आणि इतर विकसनशील देशांमधील व्यावसायिक प्रशिक्षण आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, तांत्रिक अभियांत्रिकी व वैज्ञानिक कार्यक्रम यांसह उच्च शिक्षणामध्ये प्रवेश देण्यासाठी विकसनशील देशासाठी, विशेषत: कमी विकसित देशांसाठी, विकसनशील छोटे बेट असलेल्या राज्यासाठी व आफ्रीकन देशांसाठी जागतिक पातळीवर उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तीच्या संख्येत विस्तृत वाढ करणे. | By 2020, substantially expand globally the number of scholarships available to developing countries, in particular least developed countries, small island developing States and African countries, for enrolment in higher education, including vocational training and information and communications technology, technical, engineering and scientific programmes, in developed countries and other developing countries |
4.7 4.c | सन 2030 पर्यंत, विकसनशील देशामध्ये विशेष करून कमी विकसित देशांमध्ये आणि छोटे बेट असलेल्या विकसनशील देशांमध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यातून अर्हताप्राप्त शिक्षकांच्या पुरवठ्यात वाढ करणे . | By 2030, substantially increase the supply of qualified teachers, including through international cooperation for teacher training in developing countries, especially least developed countries and small island developing States |