संपूर्ण शेयर मार्केट बेसिक माहिती मराठी मध्ये | Share market basic in Marathi.
नमस्ते मित्रांनो, ‘allforyou.in’ या ब्लॉग वर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, खरंच दररोज शेयर मार्केट मधून पैसे कमवू शकतो का? कोणीही भारतीय नागरिक पैसे कमवू शकतो का? तर उत्तर आहे मित्रांनो होय. दररोज कसे कमवायचे हे माझ्या ब्लॉग द्वारे आपणास छोट्या छोट्या टिप्स व लेख द्वारे आपणास सांगणार आहे. येथे दररोज म्हणजे आठवड्यातील ७ हि दिवसत मार्केट मधून पैसे कमविता येते असे न समजता ज्या दिवशी मार्केट चालू असते त्यादिवाशी असे समजावे. शेयर मार्केट हे आठवड्यातील ५ दिवस ( सोम-शुक्र) असे चालू असते. शनिवारी व रविवारी मार्केट हे बंद असते. शासकीय सुट्टीच्या दिवशी मात्र मार्केट हे बंद राहते. सकाळी ९ ते सायंकाळी ३:३० वाजेपर्यत मार्केट हे चालू राहते.
शेयर मार्केट म्हणजे काय? शेयर मार्केट बदलीची बेसिक संपूर्ण माहिती
जसे विविध खेळाचे नियम असतात. खेळ खेळताना नियमाच्या आत राहून खेळायचे असते. जर आपणास खेळाचे नियमच माहिती नसेल; तर तुम्ही ना खेळ खेळू शकाल, ना खेळावर विजय मिळवू शकाल. अगदी तसेच शेयर मार्केटचे सुद्धा आहे आहे. शेयर मार्केटचे ही काही नियम आहेत. ते जोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण पैसे कमवू शकणार नाही. माहिती नसताना जर तुम्ही एखादी कृती येथे केली तर हमखास तुमचे आर्थिक नुकसान होणारच. त्यामुळे सर्वात प्रथम शेयर मार्केटबदल संपूर्ण बासिक/ मुलभूत माहिती, संकल्पना, काही नियम इत्यादी हे पुढील लिंक जावून समजून घ्या.
शेयर मार्केट म्हणजे काय?
शेयर मार्केट म्हणजे काय? संपूर्ण शेयर मार्केट बदल बेसिक माहिती आपणास झाली असल्यास सर्वात प्रथम डीमट ( D-MAT) खाते आपण एखाद्या ब्रोकर अथवा अश्या सुविधा पुरविणाऱ्या बँकेत उघडू शकता.
सरावाकरिता डेमो डीमट ( D-MAT) खाते निशुल्क कसे उघडावे.
तुम्ही जर शेयर मार्केट नवीन आहात किंवा फ्रेशर आहात एखाद्या ब्रोकरकडे डीमट ( D-MAT) खाते उघडण्यापूर्वी जर आपल्याला एखादा डेमो डीमट ( D-MAT) खाते निशुल्क आणि कोणतीही प्रकिया न करिता २ मिनिटात उघडायचे असेल तर मी आपणास एक अँप सुचवितो ते अँप आपण प्लेस स्टोर मध्ये जाऊन डाउनलोड करा.
वरील अँप जर आपण डाउनलोड केले की, यावर फक्त आपला ई-मेल Id द्वारे login करून घ्यावे.
डेमो डीमट ( D-MAT) खाते असलेल्या App Stock चा शोध, खरेदी व विक्री कसे करायचे & खरेदीची ऑर्डर कसे लावावे
जेव्हा मार्केट सुरू होते 9:15 ला तेव्हा या अँपवर Stock कसे शोधावे, Stock Buy कसे करावे Stock Sell कसे करावे. खरेदीची ऑर्डर कसे लावावे. हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ पाहून समजून घ्या. इतरही बऱ्याच गोष्टी येथे आपण शिकून घ्याल. एखद्या ओरीजनल ब्रोकरकडे जेव्हा आपण खाते उघडून तेव्हा ब्रोकरकडील जे ट्रेडिंग अँप मधील जे फिचर असतात असे सर्व फिचर तुम्हाला या Stock trainer app वापरून समजेल. हा व्हिडीओ पहा म्हणजे app कसे वापरायचे याबद्दल सविस्तर आपणास माहिती मिळेल. How to Learn Share market | Virtual Trading App | Stock Trainer | Share market tips for beginners
Stock trainer virtual trading अँपवर आपल्या ट्रेडिंग खात्यावर Rs.-500000 हजार इतकी रक्कम दाखवेल. मित्रांनो तुम्ही फक्त असे येथे समजायचे आहे की, माझ्याकडे फक्त Rs.-5000 हजार रुपये आहे. इतक्याच रक्कमेची गुंतवणूक करून तुम्ही दररोज शेयर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे ते पाहूयात. तत्पूर्वी शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना काही नियम, तत्वे (principles) आणि काही facts तथ्ये पळाले की तर त्याचा नफा कमावण्यासाठी फायदा होतोच होतो.
शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक लक्षात घ्यावयाचे काही नियम, तत्वे व तथ्ये
- मार्केट खाली वर होणे हे त्याचा स्वभाव आहे. त्यानुसार प्रत्येक stock कोणत्याही सकारात्मक व नकारात्मक कारणामुळे खाली वर होत असतो.
- मार्केट मध्ये शिस्त राखणे महत्त्वाचे आहे.तुम्ही एकदा की ठरवले क x नफा मिळण्यास मी बाहेर पडणार तर नक्की बाहेर पडायचे. जोपर्यंत मला अपेक्षित Returns मिळत नाही मी स्टॉक sell करणार नाही असे ठरवले तर त्या निर्णयावर ठाम राहायचे.
- नेहमी एक लक्षात राहुद्या की, मार्केट ला कोणीही 100 % टक्के पकडू शकत नाही. एखादा स्टॉक किती वाढेल वा किती पडेल हे कोणीही 100 सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही तुम्ही शिस्त सोडायचे नाही. प्रत्येक Stock ची Movement ची सरासरी वर खाली होण्याची रेंज असते त्या नुसार आपण अनुमानित लक्ष्य निर्धारित करून लिमिट ऑर्डर लावावे.
- जर एकदा पेनी स्टॉक जर तुम्ही घेतलेल्या अवरेज किमतीच्या जवळ असेल तर नेहमी pre open मार्केट मध्ये upper सर्किटची सेल ऑर्डर लावून ठेवावे. तुम्ही कधी असा विचार करायचे नाही की मार्केट वर जाणार नाही किंवा स्टॉकवर जाणार नाही म्हणून असे अजिबात विचार करायचे नाही.
- कोणाच्या सल्ल्यावरून जरी आपण stock खरेदी केले असेल तर होणाऱ्या फायद्याला व तोट्याला कोणालाही जबाबदार धरू नये.
- मार्केट मध्ये पेशन्स खूप महत्वाचे आहे.
- सतत Upper लिमिट व Lower लिमिट लावणाऱ्या आणि कमी Volume असणाऱ्या पेनी stock पासून सावधान राहून गुंतवणूक करावे.
- नफा दिसला कि बाहेर पडणे.
- मार्केटमध्ये Corrections करेक्शन असताना थोडे थोडे Stock घेणे. 10) कमीत- कमी तीन महिने तरी चांगल्या नफ्या करिता वाट पाहणे. ( 12 ते 15 टक्के Retunes करिता)
मी आपणास काही नियम आणि टिप्स सांगत आहे. आपण जर काळजीपूर्वक ते आचरणात आणले तर तुम्ही दररोज नक्की पैसे कमविणार. शक्यतो 6%, 8% व 10% टक्के Return आपल्याला मिळाल्यास आपण Sell करावे.
शेयर मार्केट मधून दररोज 6%, 8% व 10% टक्के असे Returns/ परतावा मिळवण्यासाठीच्या टिप्स
शेयर मार्केट टिप्स-1
सर्वात प्रथम काही मोजक्याच तेजी असणाऱ्या सेक्टरमधील जास्त Volume असणाऱ्या पेनी Stock ची निवड करा. What is Penny Stocks? पेनी स्टॉक म्हणजे काय? आजच्या तारखेला म्हणजेच 2021 साली उपलब्ध असलेले पेनी Stock याची यादी
उदा. मी काही Stock येथे सुचवीत आहे. 1) Vodafone Idea (VI) 2) Dish TV, 3) Yes bank, 4) Future Consumer.
जेव्ह तुम्ही हे Stock Buy करण्याचा विचार करता, तेव्हा नेहमी त्यांची Close Prize पहा. जर Stock ची Current Prize व कालच्या Close Prize पेक्षा 40 किंवा 50 पैसेने कमी असेल तर ते आपण Buy करावे. Buy हे तीन टप्यात करावयाचे आहे. पहिला टप्पा -Rs-2000/- चा, तुम्ही खरेदी केल्यानंतर जर Stock Prize जर पुन्हा 20, 30 & 40 ………पेक्षा जास्त पैसेने कमी झाली असेल तर दुसरा टप्प्यांची रक्कम Rs-3000/- रुपयाचे तेच Stock खरेदी करावे. आतापर्यत एकूण आपली Rs.5000/ इतकी रक्कम गुंतविण्यात आली आहे. आपण खरेदी केलेल्या Stockची सरासरी दररोजची Movement up & down म्हणजेच वर खाली होण्याची मार्केट चढताना असो व उतरताना हे निरीक्षण आपण आधीच खरेदी करण्याआधी करावायचे आहे. Stock चे Day Low & Day High मधील रेज लक्षात घेऊन आपण Per Stock 30 पैसे, 40 पैसे किंवा 50 पैसे Return मिळेल असे Sell ची Limit Order आपणास लावून ठेवावे लागेल. साधारणपणे आपण अशी Oder हि Pre-open market सेशन ( 9 AM ते 9:5 AM ) Trading मध्येच लावायचे आहे. Pre Open मार्केट सेशन मध्ये Order Demo app उपलब्ध नाही ते फक्त ब्रोकर यांच्या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असते. 9:15 AM Demo app Buy/Sell ची Order लावू शकता
हा नियम पाळला कि लक्षात येईल कि रोज आपण Stock Buy कराल व Sell कराल. त्यातून तुम्ही रोज Rs.- 150+, 200+, 300+ किंवा यापेक्षा जास्त रक्कम मिळवू शकाल. सदरची रक्कम आपण तीन दिवसानंतर ( T+2 फार्मुला ) आपल्या डीमटच्या ट्रेडिंग लेजर खात्यामध्ये येईल. T+2 हा फार्मूला आपणास माहिती असायला हवे. कारण आपणास माहिती आहे की आपण वरील स्ट्रॅटेजी ही डिलीव्हरी मध्ये करतोय. समजा आपण आज शेयर काही खरेदी केले आणि उद्या थोडे केले. शेवटच्या दिवशी च्या खरेदी नंतर तीन दिवसांनी म्हणजेच सोमवारी व मंगळवारी असे खरेदी केले ते सेल हे शुक्रवारी अथवा सोमवारी होईल. मार्केट हे आठवड्याचे फक्त पाच दिवस म्हणजेच सोम -शुक्र असे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत open असते. नंतर तेथून Withdrawal Request करून आपण आपल्या बँकेच्या खात्यात रक्कम घेऊ शकतो. सकाळी आपण Withdrawal Request ब्रोकरच्या app वरून केले कि सायंकाळीपर्यत पैसे आपल्या खात्यावर येते. मार्केट चालू असतानाचा आपण हि Withdrawal Request टाकू शकतो. मी वर नमूद केलेल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्ही खरेदी विक्री केली की आपणास दिवसाला मी वर सांगितल्याप्रमाणे रक्कम मिळते.
जर आपण अद्याप कोणतेच De-mat खाते उघडले नसल्यास मी आपणास सुचवेन की आपण Angel One या बोकार कडे खाते उघडू शकता . Angel One App द्वारे ट्रेडिंग करू शकता. वापरण्यास user फ्रेंडली आहे.
I recommend you use Angel One App for hassle-free trading and win a scratchcard worth upto Rs. 2000. Download using my referral link https://play.google.com/store/apps/details?id=com.msf.angelmobile&referrer=218986odA::rne_source=B2BMAILCAMP or use my referral code 218986odA |
शेयर मार्केट टिप्स -२
जर आपल्याला कडे Dmat Account असेल आणि आपण जर कोणतेही स्टॉक खरेदी केले असेल. तो स्टॉकची Average अवरेज किमंत जर Current Prize च्या जवळ असेल तर नेहमी लक्ष्यात घ्यावे की, मार्केटमध्ये तेजी असो वा नसो तुम्ही जर तुमच्याकडे एखाद्या स्टॉकचे 500 Qty असेल तर आपण 4%, 6% व 8% रिटर्न मिळेल असे Sell लिमिट ऑर्डर Pre Open मार्केट सेशनमध्ये रोज लावून ठेवावे. जर स्टॉकने तेजी दाखवली तर Execute म्हणजेच Sell होण्याचे चान्सेस जास्त असते. आपल्याला कमीत कमी 200+ इतका फायदा आपणास मिळू शकतो.
शेयर मार्केट टिप्स -3
मित्रांनो, मी मागील दीड वर्षापासून शेयर करतोय. आणखी शिकणे हे माझे सुरूच आहे. इन्व्हेस्टमेंट व ट्रेडिंगबाबत मला आलेले अनुभव मी आपणास शेयर करीत आहे. मी वापरात असलेली टिप्स आपणास येथे सांगत आहे. तुमच्याकडे रुपये पाच हजार आहे आणि तुम्ही मी सुचविलेले पेनी स्टॉक घेतले समजा, आपण एक 1 किंवा 2 penny स्टॉक घेतले आहे. उदा Idea Vodafone चे 10 रुपयेचे किमतीचे 500 स्टॉक हे 5000 रुपयांचे घेतले आहे. मार्केट मधील मंदीमुळे अथवा या कंपनीच्या नकारात्मक बातमी 1 किंवा 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांनी Stock जर पडला असेल तर अश्या केस मध्ये अवरेज काढण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये. तुम्ही खरेदी केलेला 10 रुपये किंमतीचा स्टॉक हे 6 रुपयांवर आलेला आहे असे समजा अथवा . आणि मार्केट मधील करेक्शन मुळे ते 3-5 रुपयांनी खाली पडले असेल तर त्यावेळी तुम्ही पुढील निरीक्षण करावे. येथे पडलेल्या Stock मध्ये आणखी पाच हजार गुंतवावे. ते का गुंतवायचे तर तुम्हाला बघायचे आहे की तुमच्या स्टॉकची Support line कुठे आहे ते बघा. किती खाली जाऊन तो वर आला आहे हे बघा. एक विशिष्ट रेंज मध्ये येऊन स्टॉक काही काळ stable राहतो. तुम्ही आधीच प्रति स्टॉक 3 मायन्स आहात. तुम्ही येथे अवरेज काढायच्या भानगडीत पडू नये. जर तो स्टॉक दीर्घ काळ stable असेल तर तुम्ही 5000 रुपये इन्व्हेस्ट करा. 35, 40, व 50 पैसे Gain दिल्यास बाहेर पडावे. याद्वारे तुम्ही नंतर गुंतवलेल्या Rs.-5000 रक्कमेवर पैसे कमवू शकता. असे तुम्ही तो पर्यत करू शकता जोपर्यत Stock किमंत हि तुम्ही पहिल्यांदा गुंतवलेल्या रकमेच्या stock सरासरी किमती पर्यत असे करू शकता. यामुळे आपण ट्रेडिंगचा आनंद घ्याल. रोज मार्केट मधील नवीन अनुभव आपण घ्याला. यातून तुम्ही तुमचे ज्ञान वाढवाल आणि मार्केट मधून पैसे कामवाल.
शेयर मार्केटचे दररोजचे अपडेट मराठीतून कोठून मिळवाल
शेयर मार्केटचे दररोजचे अपडेट आपल्याला हवे असेल तर श्रीमती भाग्यश्री फाटक यांचे पुढील ब्लॉगची लिंक fallow करावे https://marketaanime.com/ त्याचबरोबर त्यांचे YouTube channel https://www.youtube.com/watch?v=XyjtID_f-Kk fallow करावे
मार्केट किंवा Stock बदलाची योग्य, अचूक & अधिकृत सर्वकष माहिती आपणास खालील वेबसाईटवर मिळेल.
- NSE India – nseindia.com
- Moneycontrol – www.moneycontrol.com
- Investing – investing.com
- Screener – screener.in
- Economic Times – economictimes.com
- Business Standard or business-standard.com
- Bloomberg Quint or bloombergquint.com
- BSE India – https://www.bseindia.com/
- Livemint – livemint.com
धन्यवाद!