-ज्ञानोदयकालीन काही विचारवंत रेने देकार्त, जॉन लॉक, न्यूटन, थॉमस मूर, हॉब्ज, इमॅन्युअल कान्ट, गटे, वॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू, स्पिनोझा, लिबनिझ, गॅलिलिओ, अंडम स्मिथ, -ज्ञानोदय चळवळ ही  समाज आणि निसर्ग अथवा सृष्टी याविषयीचे पारंपरिक-धर्मनिष्ठ दृष्टिकोन बदलवणारी घटना आहे

फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यापाठीमागील सामाजिक कारणे -फ्रेंच जनता ही तीन वर्गात विभागली गेली होती 1) प्रथम वर्ग (First Estate) 2) द्वितीय वर्ग (Second Estate) 3) तृतीय वर्ग (Third Estate) पहिले दोन वर्गास विशेष अधिकार होते आणि खास सवलती होत्या तिसऱ्या वर्गाला या नव्हत्या त्यामुळे तिसरा वर्ग हा नाराज होता.  त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. फ्रेंच लोकांना हवे होते की राजकीय सत्ता मध्ये सहभाग  (राजकीय प्रतिनिधित्व ), सामाजिक समानता, अन्न, आदर समान कर पद्धत

फ्रेंच राज्यक्रांतीची आर्थिक कारणे -फ्रान्सची जनता उपाशी असताना  ऑस्ट्रियन राजकुमारी मेरी अँटोइनेट या राणीची  पैशाची उधळपट्टी त्यामुळे फ्रान्सची तिजोरी रिकामी झालेली होती. -१६ लुई यांनी पैसे नसताना कर्ज काढून  ही अमेरिकेला मदत केली. -१६ लुईकडून फ्रेंच जनता उपाशी मरत असताना करांमध्ये (Taxes) वाढ केली.

फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे तत्त्वज्ञ, विचारवंत, बंडखोर क्रांतिकारक यांचे क्रांतीप्रवण विचार व भूमिका महत्वाची राहिली. -सन १७८९ ते १८०२ या काळात फ्रेंच राज्यक्रांतीला दिशा व प्रेरणा देणारे देणाऱ्यामध्ये थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रुसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू यांसारखे अनेक विचारवंत सामील होते. या विचारवंतानी मांडलेले विचार, नवीन कल्पना या संबध युरोपवर चर्चा करीत होत्या. त्यातूनच लोकांना प्रेरणा मिळाली. आपल्यावर अन्याय होतंय याची जाणीव लोकांना झाली. ही जुलमी राज्य व्यवस्था बदलली पाहिजे असे लोकांना वाटले आणि त्याचा परिणाम हे उठावमध्ये झाले

राष्ट्रीय सभेच्या घटना समितीने मात्र १२ ऑगस्ट १७८९ रोजी मानवी हक्कांचा जाहीरनामा सादर केला. या जाहीनाम्यात १. लोकांचे स्वातंत्र्य, समानता, सार्वभौम मान्य करण्यात आले. २. सर्वसमावेशक कायदा मान्य करण्यात आला. ३. न्यायाची संधी देण्यात आली. ४. लोकांना खाजगी मालमत्तेचा अधिकार मान्य देण्यात आले. ५. जन्माधिष्टीतविषमता नष्ट करण्यात आले. ६. लोकांना भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, शांतते एकत्र येऊन संघटना बांधणीचे स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य मान्य करण्यात आले ७. त्याचबरोबर जीवित आणि वित्त हक्क हे सर्वोच आणि पायाभूत मानण्यात आले

फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम १. राजकीय परिपक्वता फ्रेंच जनतेत आली. २. धर्मनिष्ठेच्या प्रभावातून, बाहेर येण्याची प्रक्रिया घडून आली. ३.  नवजाणिवा यांना चेतना देण्याचे काम फ्रेंच राज्यक्रांतीने केले. ४. भौतिक विकासासोबत वैचारिक, मूल्यात्मक पातळीवर मूलभूत परिवर्तन घडण्यास मदत झाली. ५. फ्रेंच जनतेची राजकीय स्वातंत्र्य मिळाले की, हक्काधिकार प्राप्त होतात आणि चांगले जीवन स्वातंत्र्य आणि आनंद प्राप्त होतो अशी आशा धारणा लोकमानसात रुजली गेली. ८. कुटुंब, धर्म, विवाह, कायदा, शिक्षण अशा संस्थांमध्ये रचनात्मक बदल घडविले. यामुळे त्यांच्यावरील सनातन धर्मप्रभाव घटला. ९.व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकत्व, अर्जित कर्तृत्व, शिक्षण आणि आवडीनुसार क्षेत्र निवडण्याची संधी प्राप्त झाली. १०. नव्या राजकीय व सामाजिक-आर्थिक व्यवस्थांचा उदय झाला. ११. स्वातंत्र्य, समता-बंधुता यांसारख्या आधुनिक मूल्यांना उजाळा मिळाला. १२. विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा विकास होऊ लागला. होऊ लागला.

औद्योगिक क्रांती -  युरोप अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक यांत्रिक शोध लागून युरोपच्या उत्पादन पद्धतीत जी क्रांती घडून आली तीच औद्योगिक क्रांती या नावाने ओळखली जाते. -सर्वप्रथम या क्रांतीची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली व नंतर हळहळू ती संपूर्ण युरोपमध्ये जाऊन पहोचले. -शोधांची मालिका सुरु झाली. विविध शोध लागल्यामुळे उत्पादन, वितरण, वाहतूक आणि संपर्क यांना गती आली. -बाजारकेंद्री आणि नफ्याच्या हेतूने उत्पादन होऊ लागले. -जीवनाच्या सर्व अंगांवर म्हणजेच  अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, समाजरचना, संस्कृती, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत औद्योगिक क्रांतीने मूलगामी क्रांतीकरी परिणाम घडविले. अधिक माहिती साठी पुढील लिंक वर जाऊ शकता.  समाजशास्त्राचा उदय